पुणे शहरातील एका बनावट कॉल सेंटरमधून शेकडो लोकांना फसवण्यात आले आहे. पोलिसांनी धाड टाकून १०० ते १५० जणांवर कारवाई केली असून, ६१ लॅपटॉप, ४१ मोबाईल आणि महत्त्वाचे कागदपत्रे जप्त केली आहेत.
बीड जिल्ह्यातील काजळी गावात दोन सख्ख्या भावंडांचा साप चावल्याने झोपेतच मृत्यू झाला आहे. १० आणि ८ वर्षांच्या या दोन मुलांना रात्री झोपेत असताना साप चावला. सकाळी उठेना झाल्याने पालकांनी पाहणी केली असता त्यांच्या शरीरावर विषारी दंशाचे निशाण आढळून आले.
पुण्यातील विशेष पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्या नावाचा उल्लेख एका आर्थिक गैरव्यवहाराच्या संदर्भात समोर आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
अभिनेते मुकुल देव, ‘सन ऑफ सरदार’, ‘आर... राजकुमार’ आणि ‘जय हो’ यांसारख्या चित्रपटांमधील प्रभावी भूमिकांसाठी ओळखले जात, यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते.
पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधील किडनी ट्रान्सप्लांट घोटाळ्यात ससून रुग्णालयाचे निलंबित वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांचे नाव समोर आले आहे.
बेळगाव येथील एका एमबीबीएस विद्यार्थिनीवर तिच्याच मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मे १८ रोजी महाराष्ट्रातील सांगली येथे घडली असून ती उशिराने उघडकीस आली आहे.
पुण्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी हा मुलीच्या कुटुंबीयांच्या परिचयाचा असून घरात स्वयंपाकी म्हणून काम करत होता. धरण परिसरात नेऊन त्याने मुलीवर अत्याचार केला.
पुणे-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय काहीजण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
महाराष्ट्रात उन्हाचा चटका संपण्याआधीच मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून, हवामान विभागाने पुढील ४८ तासांमध्ये राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण किनारपट्टीवर पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी असून, मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Maharashtra