पुण्यात अर्धवट जळालेले तीन मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. यामधअे दोन लहान मुलांसह एका महिलेची हत्या करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. नक्की प्रकरण काय आहे सविस्तर जाणून घेऊया.
या दौऱ्याचा मुख्य उद्देश नागपूरमधील भव्य नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या सोहळ्यात सहभागी होणे हा असून, दुसरा कार्यक्रमही भूमिपूजनाचा असून, तो देखील उद्या पार पडणार आहे. दोन्ही कार्यक्रमांना शहा यांच्या उपस्थितीमुळे विशेष वजन प्राप्त होत आहे.
बारामतीत रविवारी दुपारी ढगफुटी सदृश पाऊस कोसळला. यामुळे तीन इमारती खचल्या आणि कालवा फुटल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. प्रशासनाने बचावकार्य सुरू केले असून, नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे.
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला आहे. २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मोठ्या आंदोलनाची तयारी जाहीर करताना त्यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केले.
पुणे-सोलापूर महामार्गावर मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली. एक कार पाण्यात वाहून गेली, सुदैवाने जीवितहानी टळली. स्थानिकांनी महामार्ग प्राधिकरणाकडून योग्य उपाययोजना न केल्याचा आरोप केला आहे.
महाराष्ट्रात यंदा मोसमी पाऊस नियोजित वेळेपेक्षा ११ दिवस आधी दाखल झाला आहे. रविवारी तळकोकणात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, पुढील तीन दिवसांत मुंबई, पुणे, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.
इंदापूर तालुक्यातील एका फार्महाऊसवर वाढदिवसाच्या पार्टीत गोळीबार झाल्याने एक तरुण जखमी झाला आहे. या घटनेमुळे फार्महाऊस पार्टींमध्ये वाढत्या सुरक्षेच्या चिंतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
तीन महिन्यांची गर्भवती असलेल्या २२ वर्षीय पूजा गजानन निर्वळ हिने महाळुंगे येथे आत्महत्या केली. कुटुंबीयांचा आरोप आहे की सासरच्यांनी हुंड्यासाठी छळ केल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलले.
देशातील ५० शहरांमधील मालमत्ता किमतींच्या वाढीच्या अभ्यासात बंगळुरू अव्वल स्थानावर आहे. २०२४-२५ मध्ये बंगळुरूच्या मालमत्ता किमतीत १३.१% वाढ झाली आहे असे अहवालात म्हटले आहे.
खोपोलीजवळ सात वाहनांच्या साखळी अपघातात दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वाहनांची गर्दी, पावसामुळे ओलसर रस्ते आणि काही क्षणांची गडबड यामुळे हा अपघात झाला. पुन्हा एकदा वाहनचालकांना सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
Maharashtra