पुण्यातील मावळ येथे एका सहा वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक राजकीय पक्ष जोरदार तयारी करत आहेत. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी इंडिया आघाडीवर टीका केली आहे. याशिवाय महाराष्ट्रात भाजपला 41 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल असा दावा देखील अमित शाह यांनी केला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्यात. यंदा राज्यात पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार आहे. अशातच महाविकास आघाडीमधील सीट शेअरिंगचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही.
गुरुवारी सकाळी हिंगोली जिल्ह्याला भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती मिळत आहे. जिल्ह्यात 4.5 रिश्टर स्केल भूकंपाची नोंद करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर प्रत्येक राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. अशातच बारामतीच्या खासदार असलेल्या सुप्रिया सुळे यांनी पुणे लोकलने प्रवास केला.
गडचिरोली येथे पोलीस आणि C-60 कमांडोंनी संयुक्त कार्यवाही करत चार नक्षलवाद्यांना ठार केले आहे. नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्रास्रे जप्त करण्यात आली आहेत.
महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीमधील जागा वाटपाबद्दल एक मोठे विधान केले आहे. नाना पटोले यांनी म्हटले की, येणाऱ्या दोन-तीन दिवसांमध्ये उमेदवारांची यादी जारी केली जाईल.
लोकसभा निवडणुकीआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत दाखल झाले आहेत. अशातच भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये राज ठाकरे सहभागी होऊ शकतात अशा चर्चांना आता वेग आला आहे.
देशातील जागतिक दहशतवादी संघटनांचे जाळे उद्ध्वस्त करण्याच्या हेतूने राष्ट्रीय तपास संस्थेने पुण्यातील आयसिस मॉड्यूल प्रकरणात चार स्थावर मालमत्ता ‘दहशतवादाचे उत्पन्न’ म्हणून जप्त केल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने शनिवारी (16 मार्च) तारखा जाहीर केल्या आहेत. यामुळे देशभरात आदर्श आचार संहिता लागू होणार आहे. अशातच महाराष्ट्रात यंदा लोकसभेच्या निवडणुका पाच टप्प्यात होणार आहेत.