MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • MSRTC ST Bus: 'लालपरी'चा प्रवास आता 'हायटेक' आणि सुरक्षित! एसटी महामंडळाचा १११ कोटींचा मास्टरप्लॅन; ७ हजार कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

MSRTC ST Bus: 'लालपरी'चा प्रवास आता 'हायटेक' आणि सुरक्षित! एसटी महामंडळाचा १११ कोटींचा मास्टरप्लॅन; ७ हजार कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

MSRTC ST Bus: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रवाशांच्या सुरक्षेसाठी १११ कोटीचा प्रकल्प सुरू केला. यात राज्यातील ६३३ महत्त्वाच्या ठिकाणी ७०३५ अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार असून मुंबईतील नियंत्रण कक्षातून त्यावर नजर ठेवली

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Feb 18 2026, 06:49 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
'लालपरी'चा प्रवास आता 'हायटेक' आणि सुरक्षित! एसटी महामंडळाचा १११ कोटींचा मास्टरप्लॅन
Image Credit : our own

'लालपरी'चा प्रवास आता 'हायटेक' आणि सुरक्षित! एसटी महामंडळाचा १११ कोटींचा मास्टरप्लॅन

मुंबई : गावागावात पोहोचणारी आपली 'लालपरी' आता अधिक सुरक्षित होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलले असून, संपूर्ण राज्यातील एसटी स्थानके आणि आगारांना डिजिटल सुरक्षा कवच देण्याचा निर्णय घेतला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे आता प्रवाशांना निर्धास्तपणे प्रवास करता येणार आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
काय आहे एसटीचा 'डिजिटल' सुरक्षा प्लॅन?
Image Credit : our own

काय आहे एसटीचा 'डिजिटल' सुरक्षा प्लॅन?

एसटी महामंडळाने राज्यातील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सुमारे १११ कोटी रुपयांचा भव्य प्रकल्प हाती घेतला आहे. या अंतर्गत नेमके काय बदल होणार आहेत.

७,०३५ अत्याधुनिक सीसीटीव्ही: राज्यातील ६३३ महत्त्वाच्या ठिकाणी ७ हजारहून अधिक हाय-डेफिनिशन कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.

केंद्रीकृत नियंत्रण (Centralized Control): या सर्व कॅमेऱ्यांचे मुख्य नियंत्रण केंद्र (Control Room) मुंबईत असणार आहे. तिथून राज्यातील कोणत्याही बसस्थानकावरील हालचालींवर एका क्लिकवर लक्ष ठेवता येईल.

चोरी आणि गैरप्रकारांना लगाम: गर्दीच्या ठिकाणी होणारी चोरी, छेडछाड किंवा संशयास्पद हालचालींवर आता २४ तास नजर असेल. 

Related Articles

Related image1
सावधान! म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताय? 'हा' नवा नियम चुकला तर घरासोबतच लाखांची अनामत रक्कमही बुडणार!
Related image2
Income Tax Rules 2026 Update : पॅन कार्डच्या नियमांत बदल, या गोष्टींसाठी आता आवश्यक नाही
34
पहिला टप्पा यशस्वी, कुठे बसलेत कॅमेरे?
Image Credit : Getty

पहिला टप्पा यशस्वी, कुठे बसलेत कॅमेरे?

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर विभागातील ६४ महत्त्वाच्या ठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. उर्वरित २७ विभागांमध्ये, तसेच कार्यशाळा आणि विभागीय कार्यालयांमध्ये कॅमेरे बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. भोसरी येथील मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था आणि सर्व विभागीय कार्यशाळाही आता या सुरक्षा जाळ्यात येणार आहेत.

44
एका वर्षात कायापालट!
Image Credit : social media

एका वर्षात कायापालट!

हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १ वर्षाची मुदत देण्यात आली असून 'टेलिकम्युनिकेशन इंडिया लिमिटेड' या संस्थेकडे याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. केवळ स्थानकेच नाही, तर आगारांमधील तांत्रिक कामांवरही यामुळे लक्ष ठेवणे सोपे होईल. आता एसटीने प्रवास करताना तुमची सुरक्षा केवळ चालकाच्या हातात नसून, मुंबईतील हायटेक कंट्रोल रूमच्या नजरेतही असणार आहे!

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
तटकरे प्रदेशाध्यक्ष आहेत का नाही, पत्रकार परिषदेत काय केला खुलासा?
Recommended image2
Maratha Reservation Agitation : ‘सरकारकडून वारंवार विश्वासघात’; मनोज जरांगेंचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल, नव्या आंदोलनाचे संकेत
Recommended image3
Missing Link Accident : मिसिंग लिंक पुन्हा चर्चेत; बसची तीन वाहनांना जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू
Recommended image4
लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले पैसे, एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम जमा
Recommended image5
तटकरे आणि पटेल यांना कार्यकारणीतून वगळले, सुनेत्रा पवार यांच्या निर्णयाने बसला सर्वांना धक्का
Related Stories
Recommended image1
सावधान! म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताय? 'हा' नवा नियम चुकला तर घरासोबतच लाखांची अनामत रक्कमही बुडणार!
Recommended image2
Income Tax Rules 2026 Update : पॅन कार्डच्या नियमांत बदल, या गोष्टींसाठी आता आवश्यक नाही
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved