शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ज्या नेत्याला आपल्या कार्यकर्त्यांची किंमत नसते, त्यांच्याकडे ते थांबत नाहीत, असे म्हणत शिंदेंनी ठाकरेंना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. तसेच, शिंदे साहेबांनी केलेले 'ऑपरेशन टायगर' यशस्वी झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

शिंदे गट आणि उबाठा गट एकमेकांवर टीका करताना दिसून येत आहे. आता शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ज्या नेत्याला आपल्या कार्यकर्त्यांची किंमत नसते, त्यांच्याकडं ते थांबत नाही असं यावेळी बोलताना शिंदे यांनी म्हटलं आहे. आता कोणाच्या येण्याने आणि जाण्याने त्यांना फरक पडत नसल्याचं दिसत असल्याचं लक्षात येत आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

कालपर्यंत सोबत असलेल्या व्यक्तीला शिव्या देतात 

कालपर्यंत सोबत असलेल्या व्यक्तीला लगेच शिव्या देऊन हे मोकळे होतात. तर आपलं काय चुकतंय याच त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवं असं उद्धव ठाकरे यांना शिंदे यांनी टोमणा मारला आहे. त्यांनी त्यांच्या आमदाराचे तरी म्हणणे ऐकून घ्यायला हवं. आता लोक त्यांच्याकडं थांबत नसल्याचं दिसून आलं आहे, असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

स्वतःच आत्मपरीक्षण करायला हवं 

जो डॉक्टर चांगलं ऑपरेशन करतो, पेशंट त्याच्याकडेच जातात. तसेच आपण जे ऑपरेशन टायगर म्हणत होतो ते यशस्वी झालेलं आहे. शिंदे साहेबानी जे ऑपरेशन केले ते सगळे यशस्वी करून दाखवले आहेत. सचिन आहिर हे दुसऱ्या पक्षात असले तरी आमची मैत्री चांगली होती. आम्ही पक्ष संघटना कशी वाढेल, तळागाळात कशी पोहचेल यासाठीच प्रयत्न करत असल्याचं श्रीकांत शिंदे यांनी यावेळी म्हटलं आहे.