मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी प्रकाश आंबेडकर आणि पंकजा मुंडे यांना उत्तर दिले आहे. प्रकाश आंबेडकरांनी लावलेले आरोप शॉकिंग असल्याचे जरांगेंनी म्हटले आहे.

Manoj Jarange news : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रकाश आंबेडकर आणि पंकजा मुंडे या दोघांनाही उत्तर दिलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी जो आरोप केला तो माझ्यासाठी शॉकिंग आहे असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणावरुन सध्या राज्यात वातावरण चांगलंच तापलं असून अशातच सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना पाहण्यास मिळतो आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

मराठा समाज मोठा व्हावा हे माझं स्वप्न : मनोज जरांगे पाटील

मला मराठा समाजाची शक्ती वाढवायची आहे. मराठा समाज मोठा व्हावा हे माझं स्वप्न आहे. मात्र अनेकांना तसं वाटत नाही. मराठा समाज मोठा व्हावा असं अनेकांना वाटत नाही. बच्चू कडूंनी मला ऑफर दिली आहे, त्याबाबत समाजाच्या बैठकीत २९ ऑगस्टला निर्णय घेऊ असं मनोज जरांगेंनी ( Manoj Jarange ) म्हटले आहे. तसंच प्रकाश आंबेडकरांचा आरोप शॉकिंग असल्याचंही मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange ) म्हणाले.

'प्रकाश आंबेडकरांचे आरोप माझ्यासाठी शॉकिंग आहेत'

प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आरोपांवर माझा विश्वासच बसत नाही. प्रकाश आंबेडकरांचे आरोप माझ्यासाठी शॉकिंग आहेत. मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस यांचं भांडण नकली आहे. मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत, अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली होती. त्यानंतर मनोज जरांगेंनी हे आरोप माझ्यासाठी शॉकिंग असल्याचं म्हटलं आहे. हे आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलेत यावर विश्वासच बसत नाही असंही मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange ) म्हणाले.

मनोज जरांगे पाटील पंकजा मुंडेंबाबत काय म्हणाले?

मनोज जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडेंबाबत कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देणार नाही असं म्हटलं आहे. आरक्षणाला कोण विरोध करतं आहे हे सामान्य माणसांनी समजून घेणं आवश्यक आहे असंही मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange ) म्हणाले. पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगे यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिले असून जरांगे यांनी माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आभार असा टोला लगावत कोणी काहीही बोलेल त्यावर मी प्रतिक्रिया देणार नसल्याचे त्या म्हणाल्या होत्या. विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर आज त्या बीडमध्ये आहेत. मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणाचा लढा उभा केला आहे. मनोज जरांगेंनी सगेसोयऱ्यांसह आरक्षणाची मागणी केली आहे. त्यासाठी सरकारला दिलेला अल्टिमेटमही संपला आहे. आता मनोज जरांगे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

आणखी वाचा : 

लाडकी बहीण योजनेवरून शिवसेनेचा सरकारला चॅलेंज