MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Maharashtra Rain : विदर्भात पावसाचा जोर कायम, कोकण-घाटमाथ्यावरही येलो अलर्ट

Maharashtra Rain : विदर्भात पावसाचा जोर कायम, कोकण-घाटमाथ्यावरही येलो अलर्ट

मुंबई : राज्यातील काही भागात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. सातत्याने हवामान खात्याकडून कोकण-घाटमाथ्यासह अन्य जिल्ह्यांना यल्लो अलर्ट जारी केला जात आहे. अशातच आजचा पावसाचा अंदाज काय आहे हे सविस्तर जाणून घेऊया. 

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Jul 30 2025, 08:15 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
राज्यातील पावसाची स्थिती
Image Credit : X

राज्यातील पावसाची स्थिती

राज्यात काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता हवामानामध्ये पुन्हा पावसाला पोषक स्थिती निर्माण होत आहे. आज, ता. ३० जुलै, संपूर्ण विदर्भ, कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाच्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली असून, हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. उर्वरित महाराष्ट्रात ऊन-सावल्यांचा खेळ आणि हलक्याफुलक्या सरी अपेक्षित आहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाला पुरक हवामान
Image Credit : social media

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाला पुरक हवामान

वायव्य मध्य प्रदेश आणि त्याला लागूनच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. याच बरोबर, समुद्र सपाटीपासून ५.८ किमी उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थितीही कायम आहे. मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा गंगानगर, दिल्ली, सतना, दाल्तोंगंज, जमशेदपूर ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. अरबी समुद्र ते दक्षिण बांगलादेशापर्यंतही कमी दाबाचा प्रभाव जाणवत आहे.

Related Articles

Related image1
महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा,पुण्यात सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी, नागरिकांची उडाली तारांबळ
Related image2
Maharashtra Weather Alert : महाराष्ट्राच्या हवामानात बदल, 9 जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'; तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडणार का?
35
मंगळवारचे तापमान
Image Credit : social media

मंगळवारचे तापमान

मंगळवारी (ता. २९ जुलै) सकाळपासूनच्या २४ तासांत कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्राच्या धरण क्षेत्रात रिमझिम सरी सुरु होत्या. उर्वरित भागात ढगाळ हवामान, अधूनमधून सरी, आणि ऊन-सावल्यांचा खेळ पाहायला मिळाला. यामुळे तापमानात घट झाली असून, बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहे. फक्त जेऊर येथे राज्यातील उच्चांकी ३१.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

45
येलो अलर्ट असलेले जिल्हे
Image Credit : Getty

येलो अलर्ट असलेले जिल्हे

आज (ता. ३०) पुढील जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे :

  • कोकण : रायगड, रत्नागिरी
  • मध्य महाराष्ट्र : पुणे, सातारा (घाटमाथा)
  • विदर्भ : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली

या जिल्ह्यांमध्ये जोरदार सरींची शक्यता असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे हवामान विभागाने सांगितले आहे.

55
बाकी राज्यात काय?
Image Credit : ANI

बाकी राज्यात काय?

उर्वरित राज्यात ढगाळ हवामान, काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. पावसाच्या या चक्रामुळे पुढील काही दिवस राज्यभर कमाल तापमानात घट आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
महाराष्ट्र बातम्या

Recommended Stories
Recommended image1
ठाण्याच्या खासदार नरेश म्हस्केंना सलग दुसऱ्यांदा ‘संसद रत्न’ पुरस्कार; खासदार श्रीकांत शिंदेंचाही सन्मान
Recommended image2
Maharashtra : वाशिममध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का! माजी जिल्हाप्रमुख सुरेश मापारींचा भाजपमध्ये प्रवेश
Recommended image3
बच्चू कडूंचा ठाकरेंवर पलटवार, उद्धव ठाकरेंनी फसवल्याचा केला दावा
Recommended image4
कोकण रेल्वेचा पावसाळ्यापूर्वी सेफ्टी मोड ऑन! प्रवाशांच्या सुरक्षेसाठी युद्धपातळीवर प्री-मान्सून कामे सुरू
Recommended image5
Maharashtra Board Exam : दहावी-बारावी परीक्षेत मोठा बदल; उत्तरपत्रिकांचे होणार ऑनस्क्रीन मूल्यांकन
Related Stories
Recommended image1
महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा,पुण्यात सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी, नागरिकांची उडाली तारांबळ
Recommended image2
Maharashtra Weather Alert : महाराष्ट्राच्या हवामानात बदल, 9 जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'; तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडणार का?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved