दौंड ब्लॉकमुळे 29 ते 31 जुलैपर्यंत 62 रेल्वे गाड्या रद्द, प्रवाशांचे मेगाहाल

| Published : Jul 28 2024, 10:57 AM IST

Central Railway Jumbo Mega Block

सार

Daund Block News : मध्य रेल्वेने पुणे विभागातील दौंडमध्ये नॉन इंटरलॉकिंगचे काम करण्यासाठी तीन दिवसांचा ब्लॉक जाहीर केला आहे. 29 ते 31 जुलैपर्यंत रेल्वेने तब्बल 62 रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत.

 

Daund Block News : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेने पुणे विभागातील दौंडमध्ये नॉन इंटरलॉकिंगचे काम करण्यासाठी तीन दिवसांचा ब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळं 29 ते 31 जुलैपर्यंत रेल्वेने तब्बल 62 रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. अनेक गाड्या पुणे-मिरज-कुर्डूवाडी, गुंताकल-बेल्लारी-हुबळी-मिरज-पुणे आणि मनमाड-इगतपुरी-कल्याण-पनवेल-कर्जत-पुणे-मिरज या मार्गांऐवजी पर्यायी मार्गावर चालवल्या जातील.

29 जुलैला रद्द करण्यात आलेल्या रेल्वे गाड्या?

29 जुलै रोजी 17614 हजूर साहिब नांदेड-पनवेल एक्सप्रेस, 17613 पनवेल-हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस, 12025/12026 पुणे-सिकंदराबाद-पुणे शताब्दी एक्सप्रेस, 12169/12170 पुणे-सोलापूर-पुणे एक्स्प्रेस, 114019, D1409 D1400 सोलापूर-पुणे एक्सप्रेस, 01511 /01512 पुणे-बारामती-पुणे डीएमयू, 01525 पुणे-दौंड एमएमयू, 01461/01462 सोलापूर-दौंड-सोलापूर डीएमयू, 01539 -पुणे DMU, ​​01528 बारामती-पुणे मु, 01533 पुणे-दौंड DMU, ​​01532 बारामती-दौंड DMU, ​​आणि 01487/01488 पुणे-हरंगुळ-पुणे एक्स्प्रेस या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

30 जुलैला रद्द करण्यात आलेल्या रेल्वे गाड्या?

1417 पुणे-सोलापूर एक्सप्रेस, 17614 हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस, 17613 पनवेल-हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस, 11422 सोलापूर-पुणे DMU, ​​11421 हडपसर-सोलापूर DMU, ​​12169/12170 पुणे-सोलापूर 4019 एक्सप्रेस दौंड-निजामाबाद DMU, ​​11418 सोलापूर-पुणे एक्सप्रेस, 01521 दौंड-बारामती DMU, ​​01522 हडपसर-दौंड DMU, ​​01526 बारामती-पुणे DMU, ​​01525 बार पुणे-दौंड MEMU पॅसेंजर, 01525 बारामती DMU, ​​01525 ०१५२७ दौंड-बारामती डीएमयू, 01529/01530 पुणे-दौंड-पुणे, 01528 बारामती-पुणे डीएमयू, 01462/01461 दौंड-सोलापूर-दौंड डीएमयू, 01533 पुणे-दौंड डीएमयू, आणि 01448/ 01488 पुणे-हरंगुळ-पुणे स्पेशल या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

31 जुलैला रद्द करण्यात आलेल्या गाड्या?

11417 पुणे-सोलापूर एक्सप्रेस, 17614 हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस, 17613 पनवेल-हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस, 11422 सोलापूर-पुणे DMU, ​​12169/12170 पुणे-सोलापूर-पुणे एक्सप्रेस, 11406 अमरावती-पुणे, 11406 अमरावती-पुणे, 11406 अमरावती-पुणे, 1999 11418 सोलापूर-पुणे एक्सप्रेस, 01521 दौंड-बारामती DMU, ​​01522 हडपसर-दौंड DMU, ​​01526 बारामती-पुणे DMU, ​​01525 पुणे-दौंड मेमू पॅसेंजर, 01512 बारामती-दौंड-दौंड-बारामती 01525 DMU, 01529/01530 पुणे-दौंड-पुणे, 01528 बारामती-पुणे डीएमयू, 01462/01461 दौंड-सोलापूर-दौंड डीएमयू, 01533 पुणे-दौंड डीएमयू, आणि 01487/ 01488 विशेष.

दरम्यान तुम्ही जर या रेल्वे गाड्यांमधून प्रवास करणार असाल तर तुम्हाला तुमच्या ट्रेन्सची माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रवास करण्यापर्वी रेल्वेचे वेळापत्रक तपासा आणि मगच घराबाहेर पडा, अन्यथा त्रालासाला सामोरे जावे लागेल.

आणखी वाचा : 

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या, पाहा वेळापत्रक