- Home
- Maharashtra
- Central Railway Big Update : दौंड–कलबुर्गी रेल्वेबाबत मोठा निर्णय, सोलापूर प्रवाशांनाही दिलासा; जाणून घ्या संपूर्ण माहिती
Central Railway Big Update : दौंड–कलबुर्गी रेल्वेबाबत मोठा निर्णय, सोलापूर प्रवाशांनाही दिलासा; जाणून घ्या संपूर्ण माहिती
Central Railway Big Update : मध्य रेल्वेने प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन दौंड–कलबुर्गी मार्गावरील विशेष गाड्यांना फेब्रुवारी 2026 पर्यंत मुदतवाढ दिली. या निर्णयाने पुणे, दौंड, सोलापूर, कलबुर्गी प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना दिलासा मिळणारय.

दौंड–कलबुर्गी रेल्वेबाबत मोठा निर्णय
Daund–Kalaburagi Train Update: मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी महत्त्वाचा आणि आनंददायी निर्णय घेतला आहे. वाढती मागणी, प्रचंड होणारी गर्दी आणि नियमित प्रवासाची गरज लक्षात घेता दौंड–कलबुर्गी विशेष गाड्या आता फेब्रुवारी 2026 पर्यंत सतत धावणार आहेत.
हजारो प्रवाशांना मोठा फायदा होणार
या निर्णयामुळे पुणे–दौंड–सोलापूर–कलबुर्गी मार्गावर कामानिमित्त, शिक्षणासाठी किंवा व्यवसायासाठी ये-जा करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. सोलापूर रेल्वे विभागाने यासंदर्भात अधिकृत माहिती प्रसिद्ध केली आहे.
दौंड–कलबुर्गी अनारक्षित विशेष गाडी, फेऱ्यांमध्ये वाढ
गाडी क्रमांक : 01421 / 01422
पूर्वी ही अनारक्षित गाडी 1 डिसेंबर 2025 पर्यंत आठवड्यातून पाच दिवस चालणार होती (गुरुवार व रविवार वगळून).
तथापि, प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन या गाडीच्या फेऱ्या 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आठवड्यातील 5 दिवस ही गाडी धावणार – गुरुवार आणि रविवार सुट्टी
या कालावधीत एकूण 126 फेऱ्या होणार आहेत.
ही गाडी कामगार, विद्यार्थी, व्यापारी वर्ग यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची असल्याने तिचा विस्तार प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
द्वि-साप्ताहिक अनारक्षित विशेष गाडी, कालावधी वाढवला
गाडी क्रमांक : 01425 / 01426
पूर्वी ही गाडी 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत धावणार होती.
पण आता 26 फेब्रुवारी 2026 पर्यंत ही गाडी दर गुरुवारी आणि रविवारी चालू राहील.
या गाडीच्या एकूण 26 फेऱ्या होणार आहेत.
वेळापत्रक, रचना आणि थांबे – कोणताही बदल नाही
मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे की,
गाड्यांच्या वेळापत्रकात कोणताही बदल नाही
गाडीची रचना (coaches) पूर्वीप्रमाणेच राहणार
थांबेही तसेच राहतील
प्रवाशांनी वैध तिकिटासह प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात आले आहे.
