बहिणीच्या मदतीला भाऊ धावला, पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी उदयनराजे परळीत

| Published : May 11 2024, 01:56 PM IST / Updated: May 11 2024, 01:59 PM IST

pankaja and udyanraje

सार

अतिशय संघर्षाची बनलेल्या बीड लोकसभा निवडणुकीच्या मैदानात आज उदयनराजे उतरणार आहेत. उदयनराजेंनी पंकजा मुंडेंना आपली बहिण मानले आहे. त्यामुळे बहिणीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे.

 

बीड: अतिशय संघर्षाची बनलेल्या बीड लोकसभा (Beed Lok Sabha) निवडणुकीच्या मैदानात महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. तसंच आज बीडमध्ये सांगता सभांचा धडाकाही पहायला मिळतोय. आज पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) हे देखील आज परळीमध्ये असणार आहेत. उदयनराजेंनी पंकजा मुंडेंना आपली बहिण मानले आहे. त्यामुळे बहिणीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे.

त्याचबरोबर अतिशय संघर्षाची बनलेल्या बीड लोकसभा निवडणुकीच्या मैदानात आज शरद पवार आणि अजित पवार उतरणार आहेत. दोन दिवसापूर्वी शरद पवार यांनी अंबाजोगाईमध्ये सभा घेतल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची प्रचाराची सांगता शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बीड शहरामध्ये होणार आहे. शरद पवार यांची जाहीर सभा दुपारी आडीच वाजता बीड शहरातील मल्टीपर्पज ग्राउंडवर होणार आहे. तर परळी शहरात होणाऱ्या सांगता सभेला अजित पवार हे प्रमुख अतिथी असणार आहेत. उदयनराजे भोसले आणि अजित पवार हे परळी शहरात होणाऱ्या सांगता सभेच्या व्यासपीठावर असणार आहेत.

मुंडे बहीण-भावाचे कार्यकर्ते एकत्र

पहिल्यांदाच लोकसभेच्या रणांगणात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेचे कार्यकर्ते तब्बल बारा वर्षानंतर एकत्रित येणार आहे. परळीत निवडणुकीमध्ये एकमेकांच्या समोर उभा टाकणारे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे पहिल्यांदाच या निवडणुकीमध्ये एकत्रित पाहायला मिळत आहेत. या मुंडे बहीण-भावाचे कार्यकर्ते सुद्धा पंकजा मुंडे यांचा प्रचार एकत्रित करताना पाहायला मिळत आहेत.