IAS Transferred: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात प्रशासकीय फेरबदल सुरूच आहेत. या आठवड्यात, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान ७ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याची सूत्रे हातात घेतल्यापासून प्रशासकीय वर्तुळात मोठा खांदेपालट सुरु झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दिवशी सात वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील वरिष्ठ अधिकारी बदलण्याची परंपरा या आठवड्यात देखील कायम राहिली आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान आठ-दहा अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जारी होतात, आणि या आठवड्यातही ७ बड्या IAS अधिकाऱ्यांचा फेरबदल केला गेला आहे.

कोणत्या अधिकाऱ्यांची कुठे बदली झाली?

१. संजय खंदारे (IAS:RR:1996)

जुनी पोस्ट: प्रधान सचिव, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई

नवीन पोस्ट: प्रधान सचिव (पर्यटन), पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई

२. परराग जैन नैनुतिया (IAS:RR:1996)

जुनी पोस्ट: प्रधान सचिव (माहिती तंत्रज्ञान), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई

नवीन पोस्ट: प्रधान सचिव, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई

३. कुणाल कुमार (IAS:RR:1999)

नवीन पोस्ट: शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, मुंबई – व्यवस्थापकीय संचालक

४. वीरेंद्र सिंह (IAS:RR:2006)

जुनी पोस्ट: सचिव (2), सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई

नवीन पोस्ट: सचिव (माहिती तंत्रज्ञान), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई

५. ई. रावेंदिरन (IAS:RR:2008)

जुनी पोस्ट: मिशन डायरेक्टर, जल जीवन मिशन, नवी मुंबई

नवीन पोस्ट: सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई

६. एम.जे. प्रदीप चंद्रन (IAS:RR:2012)

जुनी पोस्ट: अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, पुणे

नवीन पोस्ट: प्रकल्प संचालक, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्प, पुणे

७. पवनीत कौर (IAS:RR:2014)

जुनी पोस्ट: उपमहासंचालक, यशदा, पुणे

नवीन पोस्ट: अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, पुणे

या बदल्यांमुळे राज्यातील प्रशासकीय कार्यप्रणालीत महत्त्वपूर्ण फेरबदल आणि नवीन नेतृत्वाची ओळख दिसून येणार आहे.