MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • NA जमिनींबाबत राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय! दरवर्षीचा 'टॅक्स' भरण्याची कटकट संपली; आता भरा फक्त 'वनटाइम' कर

NA जमिनींबाबत राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय! दरवर्षीचा 'टॅक्स' भरण्याची कटकट संपली; आता भरा फक्त 'वनटाइम' कर

Maharashtra One-Time NA Land Tax: सरकारने बिगरशेती NA जमिनींवरील वार्षिक कर पद्धत रद्द करून एकरकमी कर प्रणाली लागू केली. या निर्णयामुळे नागरिकांना दरवर्षी कर भरण्याच्या त्रासातून सुटका मिळणार असून, ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत एकरकमी कर भरण्याची मुदत दिली

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Feb 17 2026, 08:29 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
NA जमिनींबाबत राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय! दरवर्षीचा 'टॅक्स' भरण्याची कटकट संपली
Image Credit : social media

NA जमिनींबाबत राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय! दरवर्षीचा 'टॅक्स' भरण्याची कटकट संपली

बिगरशेती (Non-Agricultural) जमिनींच्या मालकांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत दिलासादायक बातमी दिली आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेली क्लिष्ट 'वार्षिक अकृषक कर' पद्धत आता इतिहासजमा होणार असून, त्याऐवजी 'एकरकमी (One-time) कर' भरण्याची नवीन प्रणाली लागू करण्यात आली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
काय आहे नवा बदल?
Image Credit : social media

काय आहे नवा बदल?

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) २०२५ नुसार, आता मिळकतधारकांना दरवर्षी करासाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची गरज भासणार नाही. विशेषतः ३१ डिसेंबर २००१ पूर्वी बिनशेती झालेल्या जमिनींना याचा मोठा लाभ मिळणार आहे.

Related Articles

Related image1
सकाळी अचानक नाशिकला निघायचंय? टेन्शन नको! पाहा 'या' सुपरफास्ट ट्रेन्सचं लेटेस्ट टाइमटेबल
Related image2
"छत्रपती शिवराय माझे दैवत, तुलना अशक्यच!" वादावर पडदा टाकत हर्षवर्धन सपकाळ यांनी मागितली शिवप्रेमींची माफी
36
नव्या नियमावलीतील महत्त्वाचे मुद्दे
Image Credit : gemini

नव्या नियमावलीतील महत्त्वाचे मुद्दे

वार्षिक कर रद्द: दरवर्षी आकारला जाणारा अकृषक कर आता कायमचा बंद करण्यात आला आहे.

थकीत करातून सुटका: ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचा थकीत अकृषक कर भरण्यातून सरकारने नागरिकांना मोठी सूट दिली आहे.

मुदत: हा एकरकमी (One-time) कर भरण्यासाठी सरकारने ३१ डिसेंबर २०२६ ही अंतिम तारीख निश्चित केली आहे.

दंडाची तरतूद: विहित मुदतीत कर न भरल्यास मात्र दंड आणि व्याज आकारले जाईल. 

46
असा असेल 'वनटाइम' कराचा दर (एकरकमी रूपांतर अधिमूल्य)
Image Credit : unsplash

असा असेल 'वनटाइम' कराचा दर (एकरकमी रूपांतर अधिमूल्य)

जमिनीच्या चालू बाजारमूल्यानुसार (Ready Reckoner Rate) खालीलप्रमाणे कर आकारला जाईल.

जमिनीचे क्षेत्रफळ कराचा दर (टक्केवारीत)

१,००० चौ. मी. पर्यंत ०.१०%

१,००० ते ४,००० चौ. मी. ०.२५%

४,००० चौ. मी. पेक्षा जास्त०.५०%

56
नियोजन प्राधिकरणाचे नियंत्रण कायम
Image Credit : social media

नियोजन प्राधिकरणाचे नियंत्रण कायम

अकृषक कर भरण्याची पद्धत बदलली असली, तरी जमिनीवर बाधकाम करण्यासाठी किंवा विकासकामांसाठी परवानगी घेणे अनिवार्य असेल.

शहरी भागात: मुख्याधिकारी (Chief Officer) यांच्याकडून परवानगी आवश्यक असेल.

ग्रामीण भागात: उपविभागीय अधिकारी किंवा तहसीलदार नियोजन प्राधिकरण म्हणून काम पाहतील. 

66
प्रशासन आणि नागरिकांना काय फायदा?
Image Credit : social media

प्रशासन आणि नागरिकांना काय फायदा?

या निर्णयामुळे दरवर्षी नोटीस पाठवणे आणि वसुली करणे या प्रशासकीय कसरतीतून सुटका होणार आहे. तर नागरिकांची वारंवार कर भरण्याची कटकट संपून पारदर्शकता येईल. 

Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Recommended image2
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक
Recommended image3
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे न्यूयॉर्क टाइम्सच्या फ्रंट पेजवर 'रॉकस्टार'
Recommended image4
Sangli Waste Plant : प्रदूषणाच्या तक्रारींनंतर सांगलीतील 10 मेगावॅटचा वीज प्रकल्प बंद
Recommended image5
MPSC Protest: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला रोहित पवारांचा पाठिंबा, सरकारला दिला इशारा
Related Stories
Recommended image1
सकाळी अचानक नाशिकला निघायचंय? टेन्शन नको! पाहा 'या' सुपरफास्ट ट्रेन्सचं लेटेस्ट टाइमटेबल
Recommended image2
"छत्रपती शिवराय माझे दैवत, तुलना अशक्यच!" वादावर पडदा टाकत हर्षवर्धन सपकाळ यांनी मागितली शिवप्रेमींची माफी
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved