सार

हर्षवर्धन पाटील यांना इंदापूरमध्ये त्यांचे चुलत भाऊ मयूर पाटील आणि आप्पासाहेब जगदाळे यांच्याकडून राजकीय आव्हान मिळाले आहे. मयूर पाटील यांनी अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांना पाठिंबा दिला आहे. 

हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर विधानसभा मतदारसंघातून मोठा फटका बसला आहे. त्यांच्या विरोधात अजित पवार गटाकडून दत्ता भरणे यांनी आणि अपक्ष म्हणून प्रवीण माने यांनी उमेदवारी भरला आहे. आप्पासाहेब जगदाळे यांनी दत्ता भरणे यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. हर्षवर्धन पाटील यांचे चुलत भाऊ मयूर पाटील यांनी प्रवीण माने यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. 

इंदापूरात कोणाचे राजकीय वर्चस्व - 
हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत हा खूप मोठा धक्का बसल्याचे मानण्यात आले आहे. प्रवीण माने यांना मयूर पाटील यांनी पाठींबा दिल्यामुळे त्यांची सर्व राजकीय ताकद यांच्याकडे झुकल्याचे दिसून आले आहे. मयूर पाटील यांच्यासोबत इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सचिन देवकर यांनी पाठींबा दिल्यामुळे माने यांना किती मते मिळतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहील आहे. 

मयूर पाटील यांनी काय केले आरोप? - 
मयूर पाटील म्हणाले की, “हर्षवर्धन पाटील यांना सत्ता त्यांच्या मुला-मुलींच्या हातात द्यायची आहे. कारभारी योग्य असावा असं वाटतं. तुम्ही तालुक्यावर उमेदवार लादला. भाजपमध्ये कोणाचीही गय केली जात नाही. आम्ही राजकीय स्वर्थ बघितलेला नाही, मोठ्या-मोठ्या नेत्यांनी आम्हाला वेळ दिला होता. चार वर्षांपासून माझ्या मनात खदखद होती. मी स्वार्थासाठी राजकारण करत नाही.”