Maharashtra Election : अब्दुल सत्तार औरंगजेब, दानवे यांनी केला हल्ला

| Published : Nov 02 2024, 12:21 PM IST / Updated: Nov 02 2024, 04:12 PM IST

BJP Maharashtra, Government in Maharashtra, Raosaheb Danve

सार

शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यात शाब्दिक चकमक झाली आहे. दानवे यांनी सत्तारांना औरंगजेब म्हटले असून सत्तारांची भाषा अहंकाराची असल्याचे म्हटले आहे. दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे.

शिंदे सेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्यात आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे या दोघांमध्ये भाषिक युद्ध तयार झाले आहे. रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे की, “अब्दुल सत्तार औरंगजेब आहे. औरंगजेबाबद्दल मी काही बोलणार नाही. औरंगजेबाने आम्हाला धमकावू नये असा इशारा पण त्यांनी दिला. मला राज्यसभेवर आणि विधान परिषदेवर सुद्धा जायचं नाही मी पक्षाचे काम करणार आहे. आमच्याकडे लवंगी फटाके नाही तर बॉम्ब आहेत.”

अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी सिल्लोड च्या जनतेवर छाप टाकण्याचा प्रयत्न केलाय मात्र त्यांना ते आता जमणार नाही. सत्तारांची भाषा अहंकाराची असल्याचा दानवे यांनी म्हटले आहे. अब्दुल सत्तार यांची भाषा अंहकाराची आहे. त्यांनी भाषा सुधारली पाहिजे असा टोला भाजपचे जेष्ठ नेते रावसाहेब दानवे लगावला. जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल. तुम्ही काय औरंगजेब समजून स्वारीवर निघालात का? दानवे यांनी म्हटले आहे. 

उद्धव ठाकरे यांच्यावर केला हल्ला -
गेल्या अडीच वर्षात राज्य सरकारने अनेक कल्याणकारी योजना आणल्या. मागच्या अडीच वर्षात जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी असा कोणता बोर्ड लावला की मी हे केलं ते केलं. उद्धव ठाकरे यांनी फक्त सत्तेसाठी राजकारण केलं आणि नको त्या लोकांशी युती केली. सत्तेसाठी सर्व काही करणे हाच उद्धव ठाकरे यांचा उद्देश आहे.