- Home
- Maharashtra
- Maharashtra Weather LATEST update : महाराष्ट्रात 'हिम-त्सुनामी'चा हाहाकार! 10 जिल्ह्यांमध्ये 'रेड अलर्ट', आज रात्रीपासून मोठा धोका
Maharashtra Weather LATEST update : महाराष्ट्रात 'हिम-त्सुनामी'चा हाहाकार! 10 जिल्ह्यांमध्ये 'रेड अलर्ट', आज रात्रीपासून मोठा धोका
Maharashtra Weather LATEST update: हवामान विभागाने 16 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांसाठी शीतलहरीचा इशारा दिला आहे. सोलापूरमध्ये तापमान 9 अंशांपर्यंत घसरले असून, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांसाठी शीतलहरीचा इशारा
मुंबई: राज्यात तापमान सातत्याने घसरत असल्याने थंडीची तीव्रता वाढली आहे. अनेक भागात चांगलाच गारठा जाणवू लागला असून हवामान विभागाने 16 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांसाठी शीतलहरीचा इशारा जारी केला आहे. सोलापूरच्या जेहुर येथे तब्बल 9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. तर महाबळेश्वर, नाशिक आणि गोंदिया येथे पारा 11 अंशांच्या खाली घसरल्याने थंडीने पाचवीला पुजवले आहे. पुढील काही दिवस तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
Max. Temperature: No large change in maximum temperature over Maharashtra region during next 4 days.
Min. Temperature: No large change in minimum temperature over Maharashtra region during next 5 days.— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) November 15, 2025
कोकणात किंचित उबदार वातावरण
राज्यात थंडी वाढत असली तरी कोकण विभागात अद्याप तापमानात मोठी घसरण नाही. मुंबईत कमाल तापमान 31 अंश तर किमान 17 अंश राहण्याचा अंदाज आहे. मुंबई आणि उपनगरांत दिवसभर निरभ्र आकाश आणि उजळ सूर्यप्रकाश अनुभवायला मिळणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रात थंडीची चाहूल
पुण्यात थंडीने जोर धरला आहे. येथील कमाल तापमान 29 अंश आणि किमान तापमान 12 अंश राहू शकते. पुणे शहरासह घाटमाथा परिसरातही शीतलहरीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाड्यात 6 जिल्ह्यांना अलर्ट
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये 16 नोव्हेंबरसाठी शीतलहरीचा इशारा देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरचे तापमान 29 अंश कमाल आणि 11 अंश किमान इतके असू शकते.
उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर
जळगाव, नाशिक, नाशिक घाटमाथा आणि अहमदनगर येथेही शीतलहरीचा धोका कायम आहे. नाशिकमध्ये किमान तापमान 9 अंशांपर्यंत घसरू शकते. पुढील दोन दिवस या भागात गारठा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
विदर्भातही पारा घसरतोय
विदर्भातील नागपूरमध्ये कमाल तापमान 28 अंश तर किमान 13 अंश असणार आहे. आकाश पूर्णतः स्वच्छ राहील असा अंदाज आहे. गोंदियात पारा 11 अंशांखाली घसरल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
थंडीची लाट कायम; आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज
16 नोव्हेंबर रोजी राज्यभर थंडीचे साम्राज्य कायम राहणार आहे. पुढील काही दिवस तापमानात आणखी घसरण होऊन थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी विशेषतः लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि आरोग्य समस्या असलेल्या व्यक्तींनी आवश्यक ती काळजी घ्यावी.

