नाशिक महानगरपालिकेने 2027 च्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गट ‘क’ श्रेणीतील 114 अभियांत्रिकी पदांसाठी मोठी भरती जाहीर केली. या भरतीमध्ये सहायक अभियंता, कनिष्ठ अभियंता अशा विविध पदांचा समावेश असून, उमेदवारांना ₹1,32,300 पर्यंत आकर्षक पगार मिळू शकतो.

नाशिक: नाशिक महानगर पालिकेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण अभियांत्रिकी पदवीधारकांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. गट ‘क’ श्रेणीतील अभियांत्रिकी पदांसाठी महापालिकेकडून मोठ्या प्रमाणात भरती जाहीर करण्यात आली असून, सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही अतिशय महत्त्वाची भरती ठरणार आहे. 2027 मध्ये नाशिक–त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकास कामांना वेग आला असून, या वाढत्या कामकाजासाठी कुशल अभियंत्यांची मोठी गरज निर्माण झाली आहे. त्यामुळेच महानगर पालिकेने 114 रिक्त पदांची थेट भरती जाहीर केली आहे.

अर्जाची अंतिम तारीख, संधी गमावू नका!

इच्छुक उमेदवार 10 नोव्हेंबर 2025 ते 1 डिसेंबर 2025 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करू शकतील. अर्जासोबतच आवश्यक शुल्कही ऑनलाइन भरावे लागेल.

कोणत्या पदांसाठी भरती?, 114 जागांची संपूर्ण माहिती

या भरतीमध्ये खालील अभियांत्रिकी पदांचा समावेश आहे.

सहायक अभियंता (विद्युत, स्थापत्य, यांत्रिकी)

कनिष्ठ अभियंता (विद्युत, स्थापत्य, यांत्रिकी, वाहतूक)

सहायक कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, विद्युत)

सर्व पदांच्या एकूण 114 जागा भरल्या जाणार आहेत.

महापालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज लिंक तसेच संपूर्ण PDF जाहिरात उपलब्ध आहे.

पगार – महिन्याला ₹1,32,300 पर्यंत

अभियांत्रिकी सेवेसाठी घोषित पदांनुसार उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी मिळणार असून कमाल पगार ₹1,32,300 पर्यंत मिळू शकतो. त्यामुळे ही भरती तरुण अभियांत्रिकांसाठी उत्कृष्ट करिअर संधी ठरणार आहे.

शैक्षणिक पात्रता, कोण अर्ज करू शकतो?

सहायक अभियंता :

मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत/स्थापत्य/यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी

किमान 5 वर्षांचा अनुभव

कनिष्ठ अभियंता :

संबंधित अभियांत्रिकी शाखेतील पदवी किंवा पदविका

स्थापत्य/यांत्रिकी – 3 वर्षांचा अनुभव

विद्युत – 5 वर्षांचा अनुभव

सहायक कनिष्ठ अभियंता :

स्थापत्य किंवा विद्युत शाखेतील पदवी/पदविका

3 वर्षांचा अनुभव

टीप : मराठी भाषेचे ज्ञान सर्व पदांसाठी अनिवार्य आहे.

वयोमर्यादा – कोण पात्र आहे?

साधारण प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे

SC/ST: 43 वर्षे

दिव्यांग: 45 वर्षे

माजी सैनिक: 45 वर्षे (सेवा कालावधी वजा करून)

प्रकल्प बाधित / भूकंप बाधित: 45 वर्षे

अर्धवेळ कर्मचारी: 55 वर्षे

वयोमर्यादा अर्जाच्या अंतिम तारखेप्रमाणे मोजली जाईल.

अर्ज शुल्क

खुला प्रवर्ग: ₹1000

SC/ST/EWS: ₹900

परीक्षा आणि पुढील प्रक्रिया

परीक्षेची तारीख नाशिक महापालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर केली जाईल.

परीक्षा प्रवेशपत्र परीक्षेच्या 7 दिवस आधी उपलब्ध होईल.

संकेतस्थळ: nmc.gov.in

अभियांत्रिकी क्षेत्रातील तरुणांसाठी ही नोकरीची उत्तम संधी आहे. स्थिर सरकारी नोकरी, उच्च पगार आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढणाऱ्या कामांचं महत्त्व या सगळ्यांमुळे ही भरती 2025 मधील सर्वात लक्षवेधी भरतींपैकी एक आहे.