- Home
- Maharashtra
- रेल्वेची खास सोय! महापरिनिर्वाण दिनासाठी विदर्भातून 15 विशेष गाड्या धावणार, संपूर्ण टाईमटेबल फक्त एका क्लिकवर!
रेल्वेची खास सोय! महापरिनिर्वाण दिनासाठी विदर्भातून 15 विशेष गाड्या धावणार, संपूर्ण टाईमटेबल फक्त एका क्लिकवर!
Mahaparinirvan Din 2025: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमीकडे जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष तयारी केली. ४ ते ८ डिसेंबरला नागपूर, अमरावतून मुंबईसाठी १५ अनारक्षित विशेष गाड्या चालणारय.

महापरिनिर्वाण दिनासाठी रेल्वे सज्ज
Mahaparinirvan Din 2025: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी लाखो भाविक विदर्भातून मुंबईतील चैत्यभूमीकडे जातात. यंदाही वाढणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने मोठी तयारी पूर्ण केली असून, एकूण 15 अनारक्षित विशेष ट्रेन या कालावधीत धावणार आहेत.
4 ते 8 डिसेंबरदरम्यान विशेष गाड्यांची मोठी व्यवस्था
प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून अमरावती, बडनेरा आणि नागपूर येथून मुंबईकडे अतिरिक्त गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. अमरावती–सीएसएमटी आणि नागपूर–सीएसएमटी या दोन्ही मार्गांवरच्या वारंवार फेऱ्यांमुळे विदर्भातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अमरावती–सीएसएमटी विशेष गाडी
गाडी क्रमांक 01218 – अमरावती ते मुंबई
सुटणार: 5 डिसेंबर, संध्या. 5.45
पोहोचणार: 6 डिसेंबर, पहाटे 5.25
कोच: 18
थांबे: दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, जळगाव, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा इत्यादी.
परतीची गाडी 01217 – मुंबई ते अमरावती
सुटणार: 7 डिसेंबर, रात्री 12.40
पोहोचणार: त्याच दिवशी दुपारी 12.50
नागपूर–सीएसएमटी मार्गावरील विशेष सेवा
4 डिसेंबर
गाडी 01260 – नागपूर 6.15 सायं. – सीएसएमटी 10.55 सकाळी
बडनेरा आगमन – रात्री 9.40
गाडी 01262 – नागपूर 11.55 रात्री – सीएसएमटी 3.50 दुपारी
5 डिसेंबर
गाडी 01264 – नागपूर 8.00 सकाळी
बडनेरा – 11.30 सकाळी
मुंबई – 11.45 रात्री
गाडी 01266 – नागपूर 6.15 सायं.
बडनेरा – अंदाजे 9.30 रात्री
सीएसएमटी–नागपूर परतीच्या चार विशेष फेऱ्या
6 डिसेंबर
गाडी 01249 – सीएसएमटी 8.50 रात्री – नागपूर 11.20 सकाळी (पुढील दिवस)
7 डिसेंबर
गाडी 01251 – सीएसएमटी 10.30 सकाळी – नागपूर 12.55 रात्री
बडनेरा थांबा – 9.30 रात्री
8 डिसेंबर
गाडी 01257 – सीएसएमटी 12.20 रात्री – नागपूर 4.10 दुपारी
बडनेरा आगमन – 12.45 दुपारी
दादर–नागपूर विशेष फेरी
7 डिसेंबर
गाडी 01253 – दादर 12.40 रात्री – नागपूर 4.10 दुपारी
बडनेरा थांबा – 12.45 दुपारी
या सर्व गाड्यांना 18 कोचची मोठी रचना देण्यात आली आहे. तसेच नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, मूर्तिजापूर, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम, अजनी अशा महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे असतील.
महापरिनिर्वाण दिनी प्रवाशांसाठी मोठा दिलासा
मुंबईकडे जाणारी मोठी गर्दी हाताळण्यासाठी करण्यात आलेली ही व्यापक तयारी प्रवाशांना मोठा आधार देणार आहे. विदर्भातून चैत्यभूमीकडे जाणारा प्रवास अधिक सुरळीत आणि सुरक्षित करण्यासाठी या विशेष गाड्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहील, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.

