सार
मला उद्याच्या होणाऱ्या मतमोजणी आणि निकालाबाबत धाकधूक वाटत नाही. उत्सुकता कशाला वाटेल, मी विजयी होणार आहे.
सिंधुदुर्ग : "मला उद्याच्या होणाऱ्या मतमोजणी आणि निकालाबाबत धाकधूक वाटत नाही. उत्सुकता कशाला वाटेल, मी विजयी होणार आहे. मला विजयाची 100 टक्के खात्री आहे, कार्यकत्यांनी रॅलीची तयारी केली", अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे
नारायण राणे म्हणाले, विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे असल्याचं पक्षाकडून सांगतील. बाकी कोणाचे कोण आहेत याची माहिती माझ्याजवळ नाही. एक्झिट पोलकडे मी पाहत नाही. गेली पाच पन्नास वर्ष राजकारणात घालवली, आमचे पण काही अंदाज आहेत, आम्ही पण निवडणूक लढवलीय. आम्ही निवडणूकीत नामधारी नाही तर सक्रिय होतो, अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी येणाऱ्या एक्झिट पोलवर दिली आहे.
पुढे बोलताना राणे म्हणाले, काँगेसची सत्ता येत नसल्याने एक्झिट पोलच्या विश्लेषणात सहभागी होणार नाहीत. राहुल गांधी यांच्या निवडणुकीच्या भाषणात महिलांना एक लाख रुपये देणार सांगत होते. मात्र गेली 60, 65 वर्ष सत्तेत होते तेव्हा काही दिलं नाही. आता तर त्यांना कळून चुकलं रे सत्तेत येत नाहीत. महायुतीत कोणताही विवाद नाही. छगन भुजबळ यांनी आपलं मत मांडलं आहे. त्यांचे वरिष्ठ त्यांच्याशी बोलत आहेत.
आणखी वाचा :