सार
छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे आमने-सामने आली आहे.
छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. छत्रपती संभाजीनगरात मनसे आणि उद्धव ठाकरे गट समोरासमोर आले आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे विरुद्ध शिवसेना शिंदे गटाकडून संदीपान भुमरे यांच्यात लोकसभेची लढत होत आहे. मनसेने भाजपला पाठिंबा दिला आहे. उठ दुपारी घे सुपारी, मनसे आणि दोनशे अशी घोषणाबाजी ठाकरे गटाकडून दिल्या जात आहेत. तर दुसरीकडे मनसेकडून शिवसेना ठाकरे गटाला 20 रुपये देऊ केले. मनसे- ठाकरे गट समोरासमोर येऊन एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू झाली. क्रांती चौकामध्ये दोनही सेना आमने सामने आल्या आहेत.
लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी संभाजीनगरसह दहा मतदारसंघात मतदान होणार आहे. संभाजीनगरची ही हायव्होल्टेज लढत होत आहे. मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून घोषणाबाजी बराच वेळ सुरु आहे. छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय.