सार

महाविकास आघाडीला मत देणं म्हणजे पाकिस्तानला मत देणे आहे असं वक्तव्य अमरावती लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा यांनी केलं आहे. काँग्रेसला लव लेटर पाकिस्तान लिहित आहे आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचा प्रचार करतात असंही नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

 

छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीला मत देणं म्हणजे पाकिस्तानला मत देणे आहे असं वक्तव्य अमरावती लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा यांनी केलं आहे. काँग्रेसला लव लेटर पाकिस्तान लिहित आहे आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचा प्रचार करतात असंही नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. वीस वर्ष खासदार राहिलेले आता दुवा मागताय, बाळासाहेब ठाकरे सुद्धा बघून रडत असतील, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली आहे. महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांच्या प्रचारार्थ महिला मेळाव्याला छत्रपती संभाजीनगरमधील सभेमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

काही दिवसांपूर्वीच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या माधवी लता यांच्या प्रचारासाठी हैदराबादमध्ये गेल्या होत्या. यावेळी त्यांनी आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांच्या वादग्रस्त विधानाचा दाखला देत ओवैसींवर जोरदार टिका केली होती. नवनीत राणा या आक्रमक बोलण्यासाठी ओळखल्या जातात.