MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Konkan Rains : कोकणात मुसळधार पावासाचा कहर; महामार्ग पाण्याखाली गेल्याची स्थिती

Konkan Rains : कोकणात मुसळधार पावासाचा कहर; महामार्ग पाण्याखाली गेल्याची स्थिती

कोकणातील बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी नद्यांच्या पातळीत वाढ झाली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

1 Min read
Author : Chanda Mandavkar
| Updated : Aug 16 2025, 12:31 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
कोकणात मुसळधार पाऊस
Image Credit : ANI

कोकणात मुसळधार पाऊस

गेल्या काही दिवसांपासून चिपळूणसह संपूर्ण कोकणात मुसळधार पाऊस कोसळत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः चिपळूण-गुहागर महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. मिरजोळी परिसरात महामार्गावर गुडघाभर पाणी साचल्याने रस्ता नदीसारखा दिसत आहे. यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
नद्यांना पुर
Image Credit : ANI

नद्यांना पुर

गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चिपळूण, संगमेश्वर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत. वाशिष्ठी, जगबुडी, शास्त्री आणि बाव या नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

Related Articles

Related image1
Weather Update : स्वातंत्र्यदिनी मुसळधार पावसाचा इशारा,भाजीपाला व खरीप पिकांवर संकट; शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन सूचना
Related image2
Maharashtra Rains : पुढचे 7 दिवस धोक्याचे! मुंबई-रायगडमध्ये रेड अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
35
महामार्गावर वाहतुकीला मोठा अडथळा
Image Credit : social media

महामार्गावर वाहतुकीला मोठा अडथळा

चिपळूण-गुहागर महामार्गाच्या मिरजोळी भागात पाणी साचल्याने दुचाकी, चारचाकी आणि इतर वाहनांची ये-जा कठीण झाली आहे. अनेक ठिकाणी गाड्या बंद पडत आहेत. या परिस्थितीवर स्थानिक प्रशासन आणि वाहतूक पोलिस सतत लक्ष ठेवून आहेत. नागरिकांना आणि वाहनचालकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

45
प्रशासन अलर्ट मोडवर
Image Credit : ANI

प्रशासन अलर्ट मोडवर

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, गुहागर आणि संगमेश्वर या तालुक्यांत जोरदार पाऊस सुरू आहे. चिपळूणमधील वाशिष्ठी नदी इशारा पातळी जवळून वाहत असून प्रशासन सतर्क मोडवर आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठावरील नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

55
बाजारपेठेवर पावसाचे संकट
Image Credit : iSTOCK

बाजारपेठेवर पावसाचे संकट

जर पावसाचा जोर असाच कायम राहिला, तर चिपळूण बाजार पुलाजवळील नायक कंपनीपर्यंत पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे चिपळूण बाजारपेठेत पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
महाराष्ट्र बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Rohit Pawar | मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा, रोहित पवार यांचे अन्नत्याग स्थगित
Recommended image2
Operation Tiger | शिवसेनेचे 4 खासदार मातोश्रीवर उपस्थित, तर 5 ऑनलाईन उपस्थित
Recommended image3
Shivsena MP : 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांना बळ; ठाकरेंचे इतके खासदार नॉटरिचेबल?
Recommended image4
SHARAD PAWAR : शरद पवार भाजपसोबत जाणार? रामदास आठवलेंची मोठी ऑफर
Recommended image5
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर भुजबळांचे सूचक विधान, वाचून म्हणाल हे कस झालं?
Related Stories
Recommended image1
Weather Update : स्वातंत्र्यदिनी मुसळधार पावसाचा इशारा,भाजीपाला व खरीप पिकांवर संकट; शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन सूचना
Recommended image2
Maharashtra Rains : पुढचे 7 दिवस धोक्याचे! मुंबई-रायगडमध्ये रेड अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved