- Home
- Maharashtra
- Vande Bharat Express: फक्त ७ तासांत पुणे ते नांदेड! ५ तास वाचवणारी 'वंदे भारत' सुस्साट; थांबे कुठे? अन् तिकीट किती भरावे लागणार?
Vande Bharat Express: फक्त ७ तासांत पुणे ते नांदेड! ५ तास वाचवणारी 'वंदे भारत' सुस्साट; थांबे कुठे? अन् तिकीट किती भरावे लागणार?
Vande Bharat Express: महाराष्ट्राला १३ वी पुणे–नांदेड वंदे भारत एक्सप्रेस मिळणारय, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र जोडले जातील. ही नवीन गाडी सध्याच्या १०-१२ तासांच्या प्रवासाला केवळ ७ तासांवर आणेल, ज्यामुळे प्रवाशांचा तब्बल ५ तासांचा वेळ वाचणार आहे.

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी
Vande Bharat Express: महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आणखी एक आनंदाची बातमी राज्याला लवकरच मिळणार आहे नवी पुणे–नांदेड वंदे भारत एक्सप्रेस. या आधुनिक गाडीमुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवास अधिक वेगवान, सोयीस्कर आणि आरामदायी होणार आहे.
राज्यात १३ वी वंदे भारत एक्स्प्रेस!
सध्या महाराष्ट्रात १२ वंदे भारत गाड्या धावत आहेत, आणि आता १३ वी वंदे भारत एक्स्प्रेस पुणे आणि नांदेड या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठी सज्ज आहे. रेल्वे सूत्रांनुसार, ही गाडी डिसेंबर २०२५ अखेर किंवा जानेवारी २०२६ मध्ये धावायला सुरुवात करेल.
प्रवासात तब्बल ५ तासांची बचत!
सध्या पुणे–नांदेड दरम्यान सुमारे ५५० किमी अंतर पार करण्यासाठी १० ते १२ तास लागतात. पण या नव्या वंदे भारतमुळे प्रवास फक्त ७ तासांत पूर्ण होईल! म्हणजेच प्रवाशांचा मौल्यवान वेळ आणि खर्च दोन्ही वाचणार आहेत. यामुळे व्यवसाय, शिक्षण आणि पर्यटन क्षेत्रांनाही मोठा फायदा होईल.
कुठे-कुठे थांबेल वंदे भारत?
या नव्या गाडीचे थांबे पुढीलप्रमाणे असतील. नांदेड, लातूर, धाराशिव, कुर्डुवाडी, दौंड आणि पुणे. या मार्गामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील औद्योगिक तसेच शैक्षणिक केंद्रांना थेट जोडणी मिळेल. याशिवाय मध्य रेल्वे आणि दक्षिण मध्य रेल्वे विभागांमधील रेल्वे नेटवर्क आणखी मजबूत होईल.
तिकीट दर किती असतील?
रेल्वे विभागाने प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आणले असून चाचणी धावांचे वेळापत्रक लवकरच जाहीर होईल.
प्राथमिक माहितीनुसार,
एसी चेअर कार तिकिट दर: ₹१५०० ते ₹१९०० दरम्यान असू शकतो.
सेवा वारंवारता: आठवड्यातून ५ ते ६ दिवस गाडी धावण्याची शक्यता.
अधिकृत वेळापत्रक आणि दर प्रवाशांची मागणी व मार्गावरील गर्दी पाहून निश्चित केले जातील.
महाराष्ट्रात वंदे भारतचा वेग!
सध्या मुंबई–नांदेड, मुंबई–गोवा, नागपूर–बिलासपूर, सोलापूर–मुंबई अशा १२ वंदे भारत गाड्या महाराष्ट्रात धावत आहेत. या ट्रेनमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना आधुनिक रेल्वे सुविधा मिळाल्या आहेत. आता पुणे–नांदेड वंदे भारत सुरू झाल्यानंतर मराठवाडा–पश्चिम महाराष्ट्र संपर्क अधिक जलद, आधुनिक आणि सोयीचा होणार आहे.

