- Home
- Maharashtra
- Konkan Railway Update : कोकण प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी! दिवा–सावंतवाडी एक्स्प्रेसच्या वेळेत बदल; पाहा नवीन वेळापत्रक
Konkan Railway Update : कोकण प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी! दिवा–सावंतवाडी एक्स्प्रेसच्या वेळेत बदल; पाहा नवीन वेळापत्रक
Konkan Railway Update : मध्य रेल्वेने कोकण मार्गावरील दिवा–सावंतवाडी रोड–दिवा एक्स्प्रेसच्या (10105/10106) वेळापत्रकात बदल जाहीर केला आहे. 12 जानेवारी 2026 पासून लागू होणाऱ्या या नव्या वेळेनुसार, गाडी रोहा स्थानकावर काही मिनिटे आधी पोहोचेल आणि सुटेल

कोकण प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी!
Konkan Railway Update : कोकण मार्गावर नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेने दिवा–सावंतवाडी रोड–दिवा एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात महत्त्वाचा बदल जाहीर केला आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर व्हावा आणि रेल्वेगाड्या वेळेत धावाव्यात, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 10105 आणि 10106 या दोन्ही गाड्यांच्या वेळा ‘प्रीपोन’ म्हणजेच काही मिनिटे आधी करण्यात आल्या आहेत. हे सुधारित वेळापत्रक 12 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे.
दिवा–सावंतवाडी रोड एक्स्प्रेस (10105) – नवी वेळ
दिवा ते सावंतवाडी रोडदरम्यान धावणारी ट्रेन क्रमांक 10105 सध्या रोहा स्थानकावर सकाळी 9.00 ते 9.05 या वेळेत थांबत होती. मात्र नव्या वेळापत्रकानुसार ही गाडी आता सकाळी 8.50 ते 8.55 या वेळेत रोहा स्थानकावर थांबणार आहे. यामुळे सकाळच्या वेळेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचणार असून पुढील प्रवास अधिक सुलभ होणार आहे.
सावंतवाडी रोड–दिवा एक्स्प्रेस (10106) – बदललेली वेळ
त्याचप्रमाणे सावंतवाडी रोड ते दिवा मार्गावर धावणारी ट्रेन क्रमांक 10106 सध्या सायंकाळी 5.20 ते 5.25 या वेळेत थांबत होती. सुधारित वेळापत्रकानुसार ही गाडी आता सायंकाळी 5.05 ते 5.10 या वेळेत संबंधित स्थानकावर पोहोचणार आहे.
प्रवाशांना काय होणार फायदा?
या वेळापत्रक बदलामुळे संध्याकाळच्या वेळी प्रवास करणारे नोकरदार, विद्यार्थी आणि नियमित प्रवासी वेळेत आपल्या गंतव्यस्थानी पोहोचू शकणार आहेत. शिवाय कोकण मार्गावरील रेल्वे प्रवास अधिक वेगवान, नियोजनबद्ध आणि आरामदायी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रवाशांनी नवीन वेळापत्रक तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे
दरम्यान, मध्य रेल्वेने प्रवाशांना आवाहन केले आहे की, प्रवास करण्यापूर्वी नवीन वेळापत्रक तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, जेणेकरून कोणतीही गैरसोय होणार नाही.

