जळगावमध्ये भाजप आमदार मंगेश चव्हाण आणि राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांच्यात शाब्दिक चकमक झाली आहे. चव्हाण यांनी खडसेंवर अनैतिक आरोप केल्यामुळे राजकीय वातावरण तापले असून, खडसेंनी पुरावे मांडण्याचे आव्हान दिले आहे.

Jalgaon: जळगाव मतदारसंघात राजकीय वाद पेटला आहे. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी राष्ट्रवादी (NCP) नेते एकनाथ खडसे यांच्यावर थेट शिवीगाळ करत जोरदार आरोप केले. त्यांनी “आईचं दूध पिलं असेल तर...” अशा शब्दांमध्ये खडसेंना आव्हान दिलं आणि “सरड्यासारखा U‑टर्न घेणारा माणूस” अशी उपमा दिली

चव्हाणांनी केली टीका 

चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत खुलासा केला की, खडसे यांनी भाजप आणि खासकरून गिरीश महाजन यांच्यावर अनैतिक आरोप केले. त्यावरून स्थानिक राजकारणात वातावरण तापले आहे.

खडसेंनी दिलं खुलं आव्हान 

एकनाथ खडसे यांनी मंगेश चव्हाण यांना ओपन चॅलेंज दिल की, त्यांनी आरोपांसाठी पुरावे मीडियामध्ये मांडावेत. खडसे म्हणाले की, “मी बाप‑जाद्यापासून श्रीमंत आहे, तुझ्यासारखा मी हमाल किंवा भंगार विकणारा नाही.” त्यांनी आरोपांची बाजू स्पष्ट करण्याचं आव्हान दिलं

भाजप आमदारांची प्रतिक्रिया 

राज्य मंत्र्यांसह चार भाजप आमदारांनी खडसे यांच्यावर निशाणा साधला. आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितलं की, “खडसे संधी साधू राजकारण करत आहेत, गिरीश महाजनांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत” असं मत व्यक्त केलं आहे. आमदार सुरेश भोळे आणि अमोल जावळे यांनीही खडसेंवर उत्तर देत म्हटलं की पुरावे मांडावेत, अन्यथा बिनबुजलेल्या आरोपांमुळे विकास कामावरच परिणाम होतो. त्यांनी खडसेंना सूचना केली की, भाजपा नेत्यांवर आरोप करण्याआधी खरी माहिती देणे आवश्यक आहे.

ह्या राजकीय खडखडाटामुळे जळगावचे वातावरण अगदी तापलेले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीचा प्रभाव वाढल्यामुळे राज्यात वाद वाढण्याची शक्यता आहे. पक्षांमध्ये तरी एकत्रित विकासाची भूमिका हवी आहे, असं मत स्थानिक नेत्यांनी व्यक्त केलं आहे