- Home
- Maharashtra
- डेडलाईन टळली? HSRP नंबर प्लेटसाठी सरकारने दिली 'मोठी सूट'! नवी अंतिम तारीख काय? लगेच तपासा!
डेडलाईन टळली? HSRP नंबर प्लेटसाठी सरकारने दिली 'मोठी सूट'! नवी अंतिम तारीख काय? लगेच तपासा!
HSRP Number Plate: 2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. या नियमाचे पालन न केल्यास वाहनधारकांना १०,००० रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.

2019 पूर्वीच्या गाड्यांसाठी मोठी बातमी!
मुंबई: तुमची गाडी 2019 पूर्वीची असेल आणि अजूनही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवली नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सरकारने या नंबर प्लेटसाठी आता 30 नोव्हेंबर 2025 ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. या कालावधीत नंबर प्लेट बसवली नाही, तर वाहनधारकांना १० हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.
फक्त काही दिवस उरले, अजूनही लाखो गाड्या बाकी!
केंद्र सरकारने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व गाड्यांसाठी HSRP अनिवार्य केले आहे. यासाठी आतापर्यंत तीनदा मुदतवाढ देण्यात आली. एप्रिल, जून आणि ऑगस्टनंतर आता नोव्हेंबर अखेरपर्यंत अंतिम मुदत ठरवली आहे.
तरीदेखील मुंबई आणि राज्यातील लाखो वाहनधारकांनी अजूनही ही नंबर प्लेट बसवली नाही. त्यामुळे आता सरकार पुन्हा मुदतवाढ देणार का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र परिवहन विभागाकडून कोणतीही नवीन मुदत जाहीर केलेली नाही.
उशीर झाला तर मोठा दंड!
प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी स्पष्ट केलं आहे की, ३० नोव्हेंबर २०२५ हीच अंतिम तारीख आहे. त्यानंतर नंबर प्लेट बसवली नसेल तर
HSRP बसवलेली नाही पण अर्ज केला असेल ₹१,००० दंड
HSRP बसवली नाही आणि अर्जही नाही ₹१०,००० दंड
फसवणुकीपासून सावधान!
HSRP नावाखाली बनावट वेबसाइट्स आणि एजंटमार्फत अनेकांकडून फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे केवळ अधिकृत सरकारी संकेतस्थळावरूनच नंबर प्लेटसाठी अर्ज करावा, असा इशारा परिवहन विभागाने दिला आहे.
फिटमेंट सेंटर वाढले, आता प्रक्रिया सोपी
पूर्वी HSRP बसवण्यासाठी फिटमेंट सेंटर कमी असल्याने अडचणी येत होत्या, मात्र आता २० पेक्षा अधिक अधिकृत फिटमेंट सेंटर उभारण्यात आली आहेत. त्यामुळे वाहनधारकांनी शेवटच्या क्षणापर्यंत थांबू नये, अन्यथा दंड भरण्याची वेळ येऊ शकते.
सरकार पुन्हा मुदतवाढ देणार का?
राज्यात अद्याप फक्त ४० टक्के वाहनांनाच HSRP बसवली गेली आहे. त्यामुळे सरकार जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देईल का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र ३० नोव्हेंबरनंतर जर कारवाई सुरू झाली, तर उशीर झालेल्या वाहनधारकांचा खिसा नक्कीच हलका होईल. त्यामुळे खबरदारी घ्या आणि तुमच्या गाडीवर लवकरात लवकर HSRP बसवा.

