Maharashtra HSC Result 2026 : महाराष्ट्र बोर्डाचा बारावी (HSC) निकाल अखेर जाहीर झाला आहे. पण रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. 

Maharashtra HSC Result 2026 : दहावी-बारावीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. अखेर बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये कोकण विभाग आघाडीवर असून यंदा मुलींनी बाजी मारली आहे. सर्व विभागीय मंडळातून 93.15 टक्के मुली उत्तीर्ण तर 86.80 टक्के मुलं उत्तीर्ण झाल्याचे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी (HSC) परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर केली होती. तर आज दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने निकाल जाहीर होणार आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल उपलब्ध

बोर्डाच्या घोषणेनंतर विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यापासून आपला वैयक्तिक निकाल आणि विषयनिहाय गुण अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येतील. यंदा सुमारे १४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असून निकालानंतर पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी मोठी चळवळ सुरू होणार आहे.

निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट्स

विद्यार्थी खालील संकेतस्थळांवर आपला निकाल तपासू शकतात :

  • mahresult.nic.in
  • mahahsscboard.in
  • hscresult.mkcl.org
  • results.digilocker.gov.in

गुणपडताळणी व पुनर्मूल्यांकन प्रक्रिया

ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांबाबत शंका आहे, त्यांच्यासाठी बोर्डाने पुनर्मूल्यांकनाची सुविधा उपलब्ध केली आहे. ३ मे ते १७ मे २०२६ दरम्यान ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्यापूर्वी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्यक असून, ती मिळाल्यानंतर ५ दिवसांच्या आत अर्ज करावा लागेल.

डिजिटल गुणपत्रिका आणि पुढील प्रक्रिया

निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका ऑनलाईन डाऊनलोड करता येईल. तसेच Digilocker ॲपवरही डिजिटल स्वरूपात गुणपत्रिका उपलब्ध राहणार आहे. मूळ गुणपत्रिका काही दिवसांनंतर संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांमधून दिल्या जातील.