MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Devendra Fadanvis: बेस्टमध्ये तुमचा बँड वाजला, तुम्ही ब्रँड नाही, फडणवीसांचा ठाकरे गटावर हल्लाबोल; महापौर आमचाच!

Devendra Fadanvis: बेस्टमध्ये तुमचा बँड वाजला, तुम्ही ब्रँड नाही, फडणवीसांचा ठाकरे गटावर हल्लाबोल; महापौर आमचाच!

Devendra Fadanvis: मुंबईतील भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे गटावर जोरदार टीका केली. २०१९ मधील विश्वासघात, कोरोना काळातील भ्रष्टाचार आणि विकासाच्या मुद्द्यांवरून त्यांनी ठाकरेंना लक्ष्य केले. 

2 Min read
Rameshwar Gavhane
Published : Sep 17 2025, 12:05 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
18
फडणवीसांचा ठाकरे गटावर घणाघात
Image Credit : social media

फडणवीसांचा ठाकरे गटावर घणाघात

मुंबई: आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यात आक्रमक भाषण करत विरोधकांवर जोरदार टीका केली. "बेस्टच्या निवडणुकीत तुमच्या ब्रँडचा बँड वाजवला आहे. बाळासाहेब ठाकरे हे खरे ब्रँड होते, पण तुम्ही नाही. आमच्याकडे जगातला सर्वात मोठा ब्रँड आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी!" असा टोलाही फडणवीसांनी उद्धव ठाकरे गटाला लगावला. 

चला मुंबईत परिवर्तन घडवूया!

LIVE | 🪷 भाजपा विजय संकल्प मेळावा

🕗 रा. ८.१३ वा. | १६-९-२०२५📍वरळी, मुंबई.@BJP4Maharashtra#Maharashtra#Mumbai#BJPhttps://t.co/dfQe5tASi3

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 16, 2025

28
"कोणत्याही परिस्थितीत महापालिका जिंकायचीच!"
Image Credit : social media

"कोणत्याही परिस्थितीत महापालिका जिंकायचीच!"

मुंबई भाजपच्या अमित साटम आणि आशिष शेलार यांच्या आयोजनाखाली पार पडलेल्या या मेळाव्यात फडणवीस म्हणाले, “कोणत्याही परिस्थितीत यंदा मुंबई महापालिका आपल्या ताब्यात असणार. मागच्या वेळी महापौरपद थोडक्यात हुकलं, पण यावेळी कोणाचीही युती होऊ दे, आपला विजय कुणीही रोखू शकणार नाही.” 

Related Articles

Related image1
Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात पावसाचं पुन्हा एकदा जोरदार आगमन, 19 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी
Related image2
Police Bharti 2025: राज्यात 15,000+ पोलीस भरती!, तुमच्या जिल्ह्यात किती जागा?; जाणून घ्या सविस्तर माहिती
38
"१९८५ पासून विकासाच्या नावाने फसवणूक"
Image Credit : social media

"१९८५ पासून विकासाच्या नावाने फसवणूक"

“१९८५ साली राजीव गांधी धारावी पुनर्वसनाबद्दल बोलले होते, पण काँग्रेसने सत्तेत असूनही काहीच केलं नाही. सत्ता वापरली पण मुंबईकरांसाठी नाही. आणि आता हेच लोक आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतात,” असा टोलाही फडणवीसांनी विरोधकांना लगावला. 

48
"कफनमध्ये पैसे खाल्ले, आणि आम्हाला शिकवायला निघाले!"
Image Credit : social media

"कफनमध्ये पैसे खाल्ले, आणि आम्हाला शिकवायला निघाले!"

कोरोना काळात घोटाळ्यांचे उदाहरण देत फडणवीस म्हणाले, “जे लोक कफनमध्ये पैसे खाऊ शकतात, त्यांनी आम्हाला नैतिकतेवर शिकवू नये.” 

58
"‘अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का...’"
Image Credit : social media

"‘अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का...’"

२०१९ मधील शिवसेनेच्या भूमिकेचा उल्लेख करत त्यांनी म्हटलं, “त्या वेळी आपल्याकडे महापौरपद होते. पण एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे महापौरपद हवं आहे. आम्ही मन मोठं करून शिवसेनेला ते पद दिलं. पण मग काय झालं? 'यार ने ही लुट लिया घर यार का...' असं वाटलं.” 

68
"विकास कुठे? भाषणात त्याचा उल्लेख तरी आहे का?"
Image Credit : social media

"विकास कुठे? भाषणात त्याचा उल्लेख तरी आहे का?"

"उद्धव ठाकरे यांच्या भाषणात विकासाचा एक वाक्य दाखवा, मी तुम्हाला १०० रुपये देईन!" असा उपरोधिक सवाल करत फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली. “मुंबईकरांच्या आयुष्यात काय बदल करणार, यावर एक शब्द तरी बोला,” असं आव्हानही त्यांनी दिलं. 

78
"गनिमी कावा केला, आता एकहाती सत्ता!"
Image Credit : social media

"गनिमी कावा केला, आता एकहाती सत्ता!"

“२०१९ मध्ये धोका दिला गेला, पण आम्ही रडत बसलो नाही. २०२२ मध्ये गनिमी कावा केला आणि २०२४ ला एकहाती सत्ता घेतली. आता २०२५ मध्ये मुंबईत आपलाच महापौर होणार,” असा आत्मविश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. 

88
"शेवटी मुंबईकर ठरवतील कोण सच्चा!"
Image Credit : social media

"शेवटी मुंबईकर ठरवतील कोण सच्चा!"

"काही उचक्के दररोज काहीतरी बडबडतात. पण मुंबईकरांनी याआधीच त्यांना उत्तर दिलं आहे," असं सांगून संजय राऊतांवरही अप्रत्यक्ष निशाणा साधण्यात आला.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
मुंबई बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Shaktipith Mahamarg : कल्याण–लातूर जनकल्याण द्रुतगती मार्गाची घोषणा; शक्तिपीठ महामार्गाच्या मार्गिकेत मोठा बदल
Recommended image2
Maharashtra Municipal Elections : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग; राज्य निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता लागू होणार?
Recommended image3
SSC–HSC Exam 2026: दहावी–बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट, डिजिटल मार्कशीटसाठी APAAR ID नोंदणी बंधनकारक
Recommended image4
कौटुंबिक वाद टाळून जमीन-मालमत्तेची वाटणी कशी करावी? जाणून घ्या कायदेशीर हक्क आणि सोपे उपाय
Recommended image5
Pandharpur–Tirupati Railway : पंढरपूर ते तिरुपती, थेट दर्शनासाठी विशेष रेल्वे! संपूर्ण वेळापत्रक लगेच पाहा!
Related Stories
Recommended image1
Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात पावसाचं पुन्हा एकदा जोरदार आगमन, 19 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी
Recommended image2
Police Bharti 2025: राज्यात 15,000+ पोलीस भरती!, तुमच्या जिल्ह्यात किती जागा?; जाणून घ्या सविस्तर माहिती
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved