Earthquake Maharashtra : महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा भागात आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. वाशिम, यवतमाळ आणि नांदेडमध्ये हलकी कंपने जाणवली असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. प्रशासनाने नागरिकांना अफवा न पसरवण्याचे आवाहन केले आहे.

Earthquake Maharashtra : महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा भागात आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सकाळी सुमारे ८ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास वाशिम, यवतमाळ आणि नांदेड या भागांमध्ये जमिनी हलल्याचा अनुभव नागरिकांना आला. या घटनेमुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

वाशिममध्ये सर्वप्रथम धक्का जाणवला

वाशिम शहर आणि परिसरात सकाळी ८:४५ वाजता सौम्य धक्का जाणवला. काही भागांतील नागरिकांनी घरामध्ये कंप जाणवल्याचे सांगितले.

यवतमाळच्या पुसदमध्येही हलकी कंपने

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील शेबाळपिंपरी परिसरातही त्याच सुमारास भूकंपाचे हलके धक्के जाणवले. स्थानिकांनी भूगर्भातून आवाज आल्याचेही सांगितले.

नांदेडमध्ये ८:४६ वाजता धक्का

नांदेड शहर आणि आसपासच्या भागात ८ वाजून ४६ मिनिटांनी सौम्य धक्का जाणवला. नागरिकांनी काही क्षण भीतीने घराबाहेर धाव घेतली.

जीवितहानी नाही; परिस्थिती नियंत्रणात

सुदैवाने या भूकंपामुळे कुठेही जीवित किंवा वित्तीय नुकसान झाल्याचे वृत्त नाही. काही वेळानंतर परिस्थिती सुरळीत झाली.

अधिकृत माहितीची प्रतीक्षा

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून (NCS) अद्याप भूकंपाची तीव्रता आणि केंद्रबिंदू याबाबत अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र नागरिकांच्या अनुभवांनुसार हा धक्का अत्यंत सौम्य होता.

प्रशासनाचा इशारा

विदर्भ-मराठवाडा हा भूकंपप्रवण भाग मानला जात असल्याने अशा सौम्य धक्क्यांची नोंद अधूनमधून होत असते. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.