- Home
- Maharashtra
- नोकरीची सुवर्णसंधी! छत्रपती संभाजीनगर मनपात २२२ पदांची भरती; अर्ज करण्याची मुदत वाढली, पाहा पात्रता आणि तपशील
नोकरीची सुवर्णसंधी! छत्रपती संभाजीनगर मनपात २२२ पदांची भरती; अर्ज करण्याची मुदत वाढली, पाहा पात्रता आणि तपशील
CSMC recruitment 2026: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने (CSMC) २२२ विविध पदांसाठी भरती जाहीर केली. या भरतीमध्ये अग्निशामक, कनिष्ठ अभियंता, अशा पदांचा समावेश असून तांत्रिक कारणांमुळे अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवण्यात आली.

नोकरीची सुवर्णसंधी! छत्रपती संभाजीनगर मनपात २२२ पदांची भरती
छत्रपती संभाजीनगर: सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने (CSMC) विविध विभागांतील रिक्त पदे भरण्यासाठी काढलेल्या जाहिरातीची मुदत आता वाढवण्यात आली आहे. तांत्रिक कारणांमुळे ज्या उमेदवारांना अर्ज भरता आला नव्हता, त्यांना आता ही शेवटची संधी मिळणार आहे.
रिक्त पदांचा तपशील (एकूण २२२ पदे)
या भरती प्रक्रियेद्वारे विविध श्रेणीतील पदे भरली जाणार आहेत.
अग्निशमन विभाग: अग्निशामक (१०० जागा), चालक-यंत्रचालक (१५), उपअग्निशमन केंद्र अधिकारी (०४).
अभियांत्रिकी व बांधकाम: कनिष्ठ अभियंता-स्थापत्य (३२), अतिक्रमण निरीक्षक (२४), अनुलेखक (०९).
इतर पदे: स्वच्छता निरीक्षक (१२), रोखपाल (१२), पशुधन पर्यवेक्षक (०७), उद्यान/कृषी सहाय्यक (०६), सहाय्यक सुरक्षा अधिकारी (०१).
शैक्षणिक पात्रता काय लागेल?
प्रत्येक पदासाठी पात्रता वेगळी असून मुख्य अटी खालीलप्रमाणे आहेत.
अभियंता: स्थापत्य अभियांत्रिकी (Civil) पदवी.
अग्निशामक: १०वी उत्तीर्ण आणि अग्निशमन प्रशिक्षण कोर्स.
रोखपाल: B.Com सह मराठी ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. टायपिंग.
स्वच्छता निरीक्षक: पदवी आणि स्वच्छता निरीक्षक पदविका.
इतर तांत्रिक पदे: संबंधित विषयात ITI, डिप्लोमा किंवा पदवी आवश्यक.
वयोमर्यादा आणि परीक्षा शुल्क
वय: किमान १८ वर्षे व कमाल ३८ ते ४० वर्षांपर्यंत (३१ जानेवारी २०२६ पर्यंत). मागासवर्गीय व अनाथ उमेदवारांना ५ वर्षांची सवलत असेल.
परीक्षा शुल्क: खुला प्रवर्ग - १००० रुपये, मागासवर्गीय/अनाथ/EWS - ९०० रुपये.
नोकरीचे ठिकाण: छत्रपती संभाजीनगर.
महत्त्वाची तारीख आणि अर्ज कसा करावा?
प्रशासनाने अर्ज करण्याची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख आता ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवली आहे. इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता महानगरपालिकेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सबमिट करावा.
लक्षात ठेवा
अपूर्ण अर्ज किंवा चुकीची माहिती दिल्यास अर्ज बाद ठरवला जाईल. त्यामुळे अधिकृत PDF जाहिरात वाचूनच फॉर्म भरावा.

