Ajit Pawar Plane Crash : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामतीत लँडिंगवेळी भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत अजित पवारांसह विमानातील सर्व सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती DGCA ने दिली आहे. 

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामतीत लँडिंगपूर्वी भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत विमानातील सर्व सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) कडून देण्यात आली आहे. या अपघातात अजित पवार यांचाही मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

YouTube video player

या अपघातानंतर घटनास्थळावरचे दृश्य अत्यंत हृदयद्रावक होते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओंमधून या दुर्घटनेची तीव्रता स्पष्टपणे दिसून येते. विमान अपघातानंतर आगीचे प्रचंड लोट उठले होते, तर आजूबाजूला मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी जमली होती. विमानाचा अक्षरशः चुराडा झाला असून अवशेष सर्वत्र विखुरलेले दिसत आहेत.

Scroll to load tweet…

या भीषण घटनेनंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी मोठ्या आवाजात रडत आक्रोश केला. वातावरण पूर्णतः शोकाकुल झाले होते. अजित पवार हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी आज बारामती दौऱ्यावर येणार होते. मात्र विमान लँडिंगच्या वेळीच ही दुर्दैवी दुर्घटना घडली.

YouTube video player

प्राथमिक माहितीनुसार, अपघातानंतर अजित पवार गंभीर जखमी झाल्याची चर्चा होती आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात होते. मात्र DGCA कडून नंतर देण्यात आलेल्या अधिकृत माहितीत, अपघातग्रस्त विमानातील सर्व सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. या दुर्घटनेमुळे राज्याच्या राजकारणासह संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.