राहत्या घरी गळफास घेऊन एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे. त्याने लिहिलेल्या चिट्ठीतून धक्कादायक मजकूर समोर आला आहे. पोलिसांनी चिट्ठी ताब्यात घेतली असून तपास सुरू केला आहे.

Solapur: सध्याच्या काळात आत्महत्या करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहे. "मेरे को बहुत तकलीफ दिया, बहुत ब्याज लिहा, मुझे मिलने के बाद मारा, गाली दिया" अशी चिट्ठी लिहून राहत्या घरी स्वतःला संपवून टाकलं आहे. घरातील पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन मेहबूब अब्दुल हक कुरेशी नामक व्यक्तीने आत्महत्या केली आहे. या चिट्टीतील मजकुरातील संदेशाने मात्र वेगळीच शंका उपस्थित केल्याचं दिसून आलं आहे.

पोलिसांनी चिट्ठी घेतली ताब्यात 

पोलिसांनी घटनास्थळावरून पोलिसांनी चिट्ठी ताब्यात घेतली आहे. पोलीस तपासात मेहबूबला लिहिता-वाचता येत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळं त्याची चिट्ठी कोणी लिहिली, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. याबाबतची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी दिली आहे.

आत्महत्या केलेला व्यक्ती कोण होता? 

मेहबूब कुरेशी हा नई जिंदगी परिसरातील विजयालक्ष्मी या भागात राहायला होता. तो त्या ठिकाणच्या दुकानात काम करत होता. मंगळवारी दुपारी मेहबूबचा मृतदेह त्याच्याच घरात लटकवलेल्या अवस्थेत दिसून आला होता, या घटनेची माहिती पोलिसांना समजल्यावर ते घटनास्थळी पोहचले होते. त्यामध्ये एक चिट्ठी सापडली आणि त्याच ठिकाणी आत्महत्या केलेली होती.

चिट्ठीत कोणाचे नाव होते? 

जब्बार शेखकडून होत असणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचं त्यानं म्हटलं होत. या घटनेची तक्रार नोंदवण्यासाठी कुरेशी कुटुंबीयाने पोलिसांची भेट घेतली होती. त्यात त्यांचे म्हणणे पोलिसांनी ऐकून घेतल्याचे समजले आहे. त्यामुळं आता पुढील तपासात काय उघड होत हे लवकरच समजणार आहे.