बीडमध्ये एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचा विनयभंग करण्यात आला. मुलीचे हातपाय बांधून शेतात टाकून देण्यात आले. मुलीच्या पालकांनी पोलिसांवर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.

Beed: बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्हा हादरून गेला आहे. बीडमधील अनेक मारहाणीचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. बीडच्या शिरूरमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण केलं आणि हातपाय बांधून शेतात टाकून दिले. यावेळी मुलीचा विनयभंग केल्याची माहिती समजली आहे. मुलीच्या आई वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत. गतवर्षापासून असा प्रकार दोनदा घडल्याचा दावा पालकांनी केला. मात्र, याकडे पोलिस दुर्लक्ष करत असल्याचे आरोप त्यांनी केला आहे.

तोंडावर स्प्रे मारत केलं अपहरण 

अधिक माहिती समजले की, शिरूर कासार तालुक्यातील वडाळी गावामध्ये एका लहान मुलीचे अपहरण करण्यात आले. त्या मुलीचे हातपाय बांधून शेतात टाकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला. मुलगी घराजवळ उभी असताना दोघेजण गाडीवर आले. तिथं आल्यानंतर त्यांनी तिच्या तोंडावर स्प्रे मारला आणि नंतर तिला ओढत शेतात घेऊन गेले.

तिथं गेल्यानंतर तिला एका झाडाला बांधून ठेवलं होत, बांधल्यानंतर तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. आता या प्रकरणात देखील दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी पीडित महिलेच्या वडिलांनी पोलिसांवर आरोप केले आहेत. त्यामुळं सगळं बीड हादरून गेलं आहे.

पोलिसांवर काय आरोप केले? 

यावेळी पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांवर आरोप केले आहेत. आता पोलिसांनी या प्रकरणाचा गंभीरपणे तपास केला जावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी दोन वेळा मुलीचे अपहरण झाल्यानंतर कारवाई का केली नाही, पोलिसांवर नेमका कोणाचा दबाव आहे, अशी असंख्य प्रश्न यादरम्यान उपस्थित केली जात आहेत. बीडमध्ये घडत असलेल्या घटनांमुळे सगळं वातावरण ढवळून निघालं आहे.