जळगाव येथे एका १७ वर्षीय मुलीवर तिच्या आईच्या मित्राने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलीने आईसह पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीविरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jalgaon: महाराष्ट्रातील जळगाव येथून भुसावळ शहरातून एक धक्कादायक घटना घडली आहे. एका उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या कुटुंबातील महिलेच्या मित्राने तिच्यासमोर तिच्या 17 वर्षीय मुलींचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. त्यामुळं संपूर्ण जळगाव शहर आणि जिल्हा हादरून गेला आहे. संतापलेल्या मुलीने तिच्या आईसह तिच्या मित्राच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल 

मयूर शिंपी या युवकाने मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुलीने सांगितलेल्या माहितीनुसार घरी कोणी नसताना तिच्या आईचा मित्र घरी आला. मुलीची आई घरात गेल्यानंतर त्यानं तिचा हात पकडून हातात घेतला आणि तिच्या पाठीवरून हात फिरवायला लागला. त्यानंतर त्यानं टीव्ही बंद करण्याच्या बहाण्याने मुलीला मिठीत घेतलं. अशावेळी आईने बेटा, तू मुलगी आहेस एवढं चालत असं म्हणून प्रकरणावर पडदा टाकला.

अल्पवयीन मुलीला बाहेर गाठून केला विनयभंग

मुलगी बाहेर जात असताना आईच्य मित्राने तिला पकडून तिच्यासोबत चुकीचा प्रकार करण्याचा प्रयत्न केला. आईच्या मित्राकडून करण्यात येत असलेलं चुकीचं कृत्यामुळे मुलीने चिडून हे पाऊल उचलल्याचे सांगितलं आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरुद्ध विनयभंग आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच संशयित मयूर शिंपी हा फरार झाला आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.

पॉक्सो गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ

पॉक्सो गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत चालली आहे. अल्पवयीन मुलांकडून होत असलेल्या गुन्ह्यांमुळे सध्या चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळं समाजात प्रबोधनाची गरज निर्माण झाली आहे. लहानपणापासून मुलांना शाळेपासून लैंगिक लैंगिक शिक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळं मुलांमध्ये समाजप्रबोधन निर्माण होत जाईल.