सार

एशियानेट न्यूज पोर्टलवर 6 ऑक्टोबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

१. अरबी समुद्रातील स्मारक प्रकरणी छत्रपती संभाजीराजे आक्रमक झाले असून भूमिपूजन केल्या ठिकाणी जाऊन ते आज पाहणी करणार आहेत. त्यावरून ते पंतप्रधान मोदींना जाब विचारण्याची शक्यता आहे. 

२. जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता येणार अशी शक्यता एक्सिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. 

३. देशात कुठंही निवडणुका घ्या पंतप्रधान मोदींचा पराभव निश्चित असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. 

४. यापुढं कार्यकर्त्यांना त्रास दिल्यास वेगळा निर्णय घेऊ असं रामराजे निंबाळकर यांनी अजित पवार यांना उद्देशून म्हटलं आहे. 

५. महाविकास आघाडी लाडकी बहीण योजना बंद करतील असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.