World Food Safety Day 2024 : फूडच्या पाकिटावर हेल्दी लिहिलेय म्हणून सामान खरेदी करता का? नेहमीच तपासून पाहा लेबल अन्यथा...

| Published : Jun 07 2024, 10:24 AM IST

World Food Safety Day 2024
World Food Safety Day 2024 : फूडच्या पाकिटावर हेल्दी लिहिलेय म्हणून सामान खरेदी करता का? नेहमीच तपासून पाहा लेबल अन्यथा...
Share this Article
 • FB
 • TW
 • Linkdin
 • Email

सार

एखादी वस्तू हेल्दी आहे हे त्याच्या पाकिटावर फूड कंपन्या आवर्जून लिहितात. खरंतर, हेल्दी फूड समजून नागरिक याच कॅटेगरीतील काही वस्तूंची खरेदी करतात. पण हेल्दी लिहिलेय म्हणून सामान खरेदी करत असाल तर थांबा. अन्यथा आरोग्यासंबंधित समस्यांचा सामना कराल. 

World Food Safety Day 2024 : प्रत्येक वर्षी 7 जूनला ‘जागतिक अन्न सुरक्षा दिवस’ साजरा केला जातो. यावेळी नागरिकांना दूषित अन्नपदार्थ आणि यापासून होणाऱ्या आजारांसह दूर कसे राहायचे यासंदर्भात जनजागृती केली जाते. अशातच फूडच्या पाकिटावर हेल्दी लिहिलेय म्हणून सामान खरेदी करत असाल तर थांबा. अशी चूक करणे टाळा अन्यथा आरोग्यासंबंधित गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

खरंतर, सोशल मीडिया, टेव्हिजनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फूड्सची जाहिरातबाजी केली जाते. एवढेच नव्हे मार्केटमध्ये एखादे फूड नवीन आल्यास त्याचे उत्तम ब्रँडिग ते प्रमोशन देखील केले जाते. अशातच फूडच्या पाकिटावर हेल्दी लिहिलेय म्हणून बहुतांशजणांना ते आरोग्यासाठी फायदेशीर असते असेही वाटते. अशातच हेल्दी फूडच्या नावाखाली काहीजण फूड खरेदी करतात. पण तुम्हाला माहितेय का, फूडच्या पाकिटावर हेल्दी लिहिले असले तरीही लेबल वाचून खरेदी करणे फार महत्त्वाचे आहे. जाणून घेऊया फूडच्या पाकिटावर लेबल कसा वाचायचा आणि कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे याबद्दल सविस्तर...

पाकिटावरील लोगो तपासून पाहा

 • प्रोडक्टच्या लेबलवर FSSAI चा लोगो आणि परवाना क्रमांक असणे गरजेचे आहे.
 • बाटलीबंद ड्रिंक्स, मिनिरल वॉटरसह स्किम्ड मिल्क पावडर अशा काही वस्तूंवरील ISO मार्क तपासून पाहा.
 • वनस्पति तेल, डाळी, कडधान्ये, मसाले, मध, फळ आणि भाज्यांवरील एगमार्क तपासून पाहा.
 • पदार्थ व्हेज असल्यास फूडच्या पाकिटावर हिरव्या रंगातील डॉट दिला जातो.
 • नॉन-व्हेज पदार्थ असल्यास त्यांच्या फूडच्या पाकिटावर ब्राउन रंगातील डॉट असतो.
 • फूडमध्ये कोणत्या वस्तू आहेत हे असे तपासून पाहा
 • पाकिटाच्या लेबवर फूडमध्ये कोणत्या वस्तूंचा वापर केलाय हे तपासून पाहा.
 • फूडमधील काही तत्त्वांमुळे अ‍ॅलर्जीची समस्या उद्भवू शकते.
 • आर्टिफिशिअल रंग आणि गोडव्याबद्दल काय लिहिलेय हे तपासून पाहा.

या देखील गोष्टी लक्षात ठेवा
पाकिटावरील लेबवर काही सूचना दिल्या जातात. फूडचे सेवन कसे करावे, स्टोअर करण्याची पद्धत याबद्दलची माहिती व्यवस्थितीत वाचावी. याशिवाय पाकिटामधील फूडचे सेवन केल्यानंतर तुम्हाला किती प्रमाणात एनर्जी मिळते अशाकाही गोष्टीही लिहिलेल्या असतात.

आणखी वाचा : 

Bird Flu मुळे जगात पहिला मृत्यू, जाणून घ्या H5N2 बद्दल सर्वकाही

‘Best Before’ आणि 'Expiry Date' एकच आहेत का ? FSSAI ने सांगितला फरक,वाचा सविस्तर