MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Phone While Eating : जेवताना मोबाईल वापरताय? मग हे भयंकर सत्य नक्की वाचा

Phone While Eating : जेवताना मोबाईल वापरताय? मग हे भयंकर सत्य नक्की वाचा

आजकाल मोबाईलशिवाय आपलं पानही हलत नाही. उठता-बसता, कुठेही गेलो तरी आपण फोन स्क्रोल करत असतो. पण जेवताना मोबाईल वापरण्याची सवय तुमच्या आरोग्यासाठी चांगली आहे की वाईट? यामागचं धक्कादायक सत्य आज आपण जाणून घेणार आहोत.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Oct 15 2026, 08:58 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
जेवताना मोबाईल वापरल्यास काय होतं?
Image Credit : pexels

जेवताना मोबाईल वापरल्यास काय होतं?

आजकाल अनेक जण जेवताना किंवा नाश्ता करताना फोनचा खूप वापर करतात. लहान मुले असोत किंवा मोठे, जेवताना फोन वापरल्यास नुकसान नक्कीच होणार. डॉक्टरांच्या मते, जेवताना फोन वापरणे हे एक व्यसन बनले आहे. याचा आपल्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. तुम्हीही असं करत असाल, तर भविष्यात तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होईल, याची सविस्तर माहिती खाली दिली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
शरीरावर वाईट परिणाम, सर्वात आधी लठ्ठपणा
Image Credit : pexels

शरीरावर वाईट परिणाम, सर्वात आधी लठ्ठपणा

  • विज्ञानानुसार, पोट आणि मेंदूचा थेट संबंध असतो.
  • जेवताना पोट भरल्याचा संदेश पोटातून मेंदूकडे जातो.
  • जेवायला सुरुवात केल्यानंतर २० मिनिटांनी हा संदेश मेंदूपर्यंत पोहोचतो.
  • पण आपण सतत मोबाईल बघत राहिलो, तर मेंदू आणि पोटाचा संपर्क तुटतो.
  • विज्ञानाच्या भाषेत याला 'माइंडलेस इटिंग' (Mindless Eating) म्हणतात.
  • मोबाईल वापरत जेवल्यामुळे आपण भुकेपेक्षा ३० ते ४० टक्के जास्त जेवतो.
  • आपल्याला हे समजतही नाही आणि आपण अन्न नीट न चावता तसेच गिळतो.
  • यामुळेच आपल्या पोटाची चरबी आणि लठ्ठपणा वाढतो.

Related Articles

Related image1
Laptop Health Tips: तासनतास लॅपटॉपवर काम करताय? मग पाठ आणि मानेची वाट लागणारच! हे ७ उपाय करा आणि टेन्शन फ्री राहा
Related image2
Mental Health Insurance : थेरपीचा खर्च इन्शुरन्समध्ये कव्हर होतो का? जाणून घ्या
34
पचनसंस्थेवर होतो थेट परिणाम
Image Credit : pexels

पचनसंस्थेवर होतो थेट परिणाम

आपली पचनक्रिया पोटात नाही, तर तोंडातूनच सुरू होते. आपण जेव्हा एखादा पदार्थ बघतो किंवा त्याचा वास घेतो, तेव्हा आपल्या तोंडात लाळ तयार होते. यासोबतच पोटात पचनासाठी आवश्यक असलेले एन्झाइम्स तयार होतात. पण मोबाईल वापरताना आपलं पूर्ण लक्ष स्क्रीनवर असतं, त्यामुळे ही प्रक्रिया नीट होत नाही. याचा परिणाम म्हणून पचनसंस्थेकडे जाणारा रक्तप्रवाह कमी होतो आणि आपण खाल्लेलं अन्न पचत नाही. यामुळे पोट फुगणे, गॅस यांसारख्या अनेक समस्या निर्माण होतात.

44
टॉयलेट सीटपेक्षाही जास्त घाणेरडा असतो फोन
Image Credit : pexels

टॉयलेट सीटपेक्षाही जास्त घाणेरडा असतो फोन

आपला मोबाईल टॉयलेट सीटपेक्षा १० पट जास्त घाणेरडा असतो. फोनच्या स्क्रीनवर अत्यंत धोकादायक बॅक्टेरिया आणि सूक्ष्मजीव असतात, हे अनेक संशोधनांमधून सिद्ध झाले आहे. आपण कितीही हात धुवून जेवायला बसलो, तरी फोनवरील घाण आपल्या शरीरात जातेच.

ई-कोलाय (E. coli) सारखे धोकादायक बॅक्टेरिया अन्नावाटे थेट आपल्या पोटात प्रवेश करतात. यामुळे आपण आजारी पडून अंथरुणाला खिळू शकतो. त्यामुळे जेवणाच्या खोलीतून मोबाईल नेहमी दूर ठेवा. फक्त २० मिनिटे मोबाईल बाजूला ठेवून जेवा आणि निरोगी राहा.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
3rd T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
209/7
IND beat WI by 14 runs
Schedule ›
2nd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
215/3
SLSL
133/7
PAK beat SL by 82 runs
Schedule ›
2nd T20 • IND vs WI
Result
INDIND
249/5
WIWI
252/4
WI beat IND by 6 wickets
Schedule ›
1st T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
187/6
SLSL
182/8
PAK Won by 4 wickets
Schedule ›
1st TEST • SA vs AUS
Result
SASA
284 & 206
AUSAUS
390 & 314/6
AUS beat SA by 214 runs
Schedule ›
1st T20 • IND vs WI
Result
INDIND
172/2
WIWI
171
IND won by 8 wickets
Schedule ›
5th T20 • IND vs WI
INDIND
Sat, 17 Oct, 2026
WIWI
07:00 pm
Match yet to begin.
Schedule ›
2nd TEST • SA vs AUS
SASA
Sun, 18 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
Happy Panchami 2026 : पंचनीमिनित्त तुमच्या मित्र-परिवाराला पाठवा हे ७५+ खास मेसेजेस आणि कोट्स!
Recommended image2
Horoscope 15th October 2026 : मेष ते मीन राशींसाठी पंचमीचा दिवस कसा असेल? वाचा तुमचे आजचे राशीभविष्य
Recommended image3
Ear Chain Designs : कानांचे सौंदर्य वाढवणाऱ्या 'माटी' डिझाईन्स, पाहा कलेक्शन
Recommended image4
Washing Machine Buying Guide : टॉप लोड की फ्रंट लोड? कोणती वॉशिंग मशीन वाचवेल तुमचं वीज बिल?
Recommended image5
Attention Infidelity : जोडीदार बोलताना फोनमध्ये बिझी असतो? ही सवय नातं मोडण्यास ठरू शकते कारणीभूत
Related Stories
Recommended image1
Laptop Health Tips: तासनतास लॅपटॉपवर काम करताय? मग पाठ आणि मानेची वाट लागणारच! हे ७ उपाय करा आणि टेन्शन फ्री राहा
Recommended image2
Mental Health Insurance : थेरपीचा खर्च इन्शुरन्समध्ये कव्हर होतो का? जाणून घ्या
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved