सार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एप्रिल महिन्यातील बँक हॉलिडेची लिस्ट जारी केली आहे. राज्यावर बँकांना वेगवेगळ्या दिवशी सुट्ट्या असतील. एप्रिलमध्ये देशभर एकूण १४ दिवस बँकांचे कामकाज बंद राहतील ज्यामध्ये सहा साप्ताहिक सुट्ट्यांचाही समावेश आहे.

दिल्ली : उद्यापासून सुरु होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षाच्या निमित्ताने बँकेला अकाउंट क्लोजिंग करावे लागते त्यामुळे देशातील काही प्रमुख शहरांमधील बँकेला सुट्टी असणार आहे. त्यामुळे उद्या आठवड्याची सुरुवात जरी असली तरी काही बँक बंद असू शकतात. जाणून घ्या सविस्तर.

1 एप्रिल 2024 पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे. याआधी, भारतीय रिझर्व्ह बँकेने एप्रिल महिन्यात येणाऱ्या बँक हॉलिडेचे कॅलेंडर जारी केली असून विविध राज्यांमध्ये होणाऱ्या सण आणि इतर प्रसंगांशी संबंधित सुट्ट्या देखील बँकेच्या यादीत आहेत. याशिवाय एप्रिल महिन्यातील शनिवार आणि रविवार या साप्ताहिक सुट्ट्यांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. देशभर एप्रिल महिन्यात एकूण 14 दिवस बँका बंद राहतील.

महिन्याचा प्रत्येक शनिवार रविवार बँक बंद असेल :

प्रत्येक महिन्याच्या रविवारी, दुसरा शनिवार आणि चौथा शनिवारी बँका बंद असतात. एप्रिलमध्ये देशातील सर्व बँका 7 एप्रिल (रविवार), 13 एप्रिल (दुसरा शनिवार), 14 एप्रिल (रविवार), 21 एप्रिल (रविवार), 27 एप्रिल (चौथा शनिवार) आणि 28 एप्रिल (रविवार) बंद राहतील.

एप्रिल महिन्यातील बँक हॉलिडेची यादी:

1 एप्रिल : आर्थिक वर्ष संपते तेव्हा बँकेला अकाउंट क्लोजिंग करावे लागते. त्यामुळे महिन्याच्या पहिल्या दिवशी मुंबई, आगरतळा, अहमदाबाद, बेलापूर, बेंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चेन्नई, डेहराडून, गुवाहाटी, हैदराबाद - आंध्र प्रदेश आणि तेलंगणा, इम्फाळ, इटानगर, जयपूर, जम्मू, कानपूर, कोची, कोहिमा, लखनौ येथे १ एप्रिल रोजी बँका बंद राहतील.

5 एप्रिल : बाबू जगजीवन राम यांच्या जयंती आणि जुम्मत-उल-विदा निमित्त तेलंगणा, जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील.

9 एप्रिल : बेलापूर, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, इंफाळ, जम्मू, मुंबई, नागपूर, पणजी आणि श्रीनगरमध्ये गुढीपाडवा/उगादी सण/तेलुगु नववर्ष आणि पहिल्या नवरात्रीच्या निमित्ताने बँका बंद राहतील.

10 एप्रिल : कोची आणि केरळमध्ये ईदमुळे बंद

11 एप्रिल : ईदमुळे देशभरात अनेक ठिकाणी बँका बंद राहतील.

15 एप्रिल : हिमाचल दिनानिमित्त गुवाहाटी आणि शिमला बँका बंद राहतील.

17 एप्रिल : रामनवमीच्या मुहूर्तावर अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, डेहराडून, गंगटोक, हैदराबाद, जयपूर, कानपूर, लखनौ, पाटणा, रांची, शिमला, मुंबई आणि नागपूरमध्ये बँका उघडणार नाहीत.

20 एप्रिल : गरिया पूजेच्या निमित्ताने आगरतळामध्ये बँका बंद राहतील.

आणखी वाचा :

क्लिक हिअर' चा ट्रेंड नेमका काय ? अनेक राजकीय नेत्यांचीही यात उडी

'काँग्रेसने क्रूरपणे कचाथीवू बेट सोडले', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पक्षाच्या धोरणांवर केले प्रश्न उपस्थित