Marathi

साबुदाणा कशापासून तयार होतो माहितेय का?

Marathi

साबुदाणा म्हणजे काय?

साबुदाणा एक कंदमूळ श्रेणीतील स्टार्च युक्त खाद्य पदार्थ आहे. याचा वापर उपवासाचे पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो.

Image credits: Freepik
Marathi

कोणत्या कंदापासून तयार होतो?

साबुदाणा टॅपिओका कंदापासून काढल्या जाणाऱ्या स्टार्चपासून तयार केला जातो. टॅपिओका कंदाचा किस करुन त्यामधून स्टार्च काढला जातो.

Image credits: Amazon
Marathi

असा तयार होतो साबुदाणा

स्टार्चमध्ये पाणी मिक्स करुन त्याला मोत्यासारखा लहान आकार दिला जातो. यानंतर दाणे उन्हामध्ये सुकवल्यानंतर साबुदाणे तयार होतात.

Image credits: Freepik
Marathi

उपवासावेळी साबुदाण्याचे पदार्थ

श्रावणी सोमवार किंवा कोणत्याही उपवासावेळी साबुदाण्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार केले जातात.

Image credits: Freepik
Marathi

साबुदाण्याचा वापर

साबुदाण्याचा वापर भारतात व्रत-उपवासावेळी खासकरुन केला जातो. याशिवाय साबुदाण्यापासून पापड, वडा, खीरही केली जाते.

Image credits: Freepik
Marathi

साबुदाण्याची वेगवेगळी नावे

वेगवेगळ्या ठिकाणी साबुदाण्याला टॅपिकाओ पर्ल्स, सागो पर्ल्स आणि फॅराइन पर्ल्स अशा नावाने ओखळले जाते.

Image Credits: Freepik