- Home
- lifestyle
- Price Tag Removal : गिफ्टवरील किंमत 5 सेकंदात गायब! बॉक्स खराब न करता स्टिकर काढण्याची Viral Trick
Price Tag Removal : गिफ्टवरील किंमत 5 सेकंदात गायब! बॉक्स खराब न करता स्टिकर काढण्याची Viral Trick
गिफ्ट बॉक्स किंवा नवीन पुस्तकावरचा प्राईस टॅग काढताना कागद फाटतो का? आता नखाने खरवडत बसू नका! फक्त ५ सेकंदात स्टिकर काढण्याची एक जबरदस्त ट्रिक व्हायरल झाली आहे, पाहा...
15
Image Credit : Social Media
नखाने खरवडू नका!
वाढदिवस किंवा कोणत्याही सणाला आपण मित्र-मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना गिफ्ट देतो. पण गिफ्ट पॅकवर किंमत (Price Tag) दिसत असेल, तर देणाऱ्याला अवघडल्यासारखं होतं. हाताने किंवा नखाने स्टिकर काढायला गेल्यास बॉक्स खराब होतो. पण आता फक्त ५ सेकंदात किंमतीचं स्टिकर काढण्याच्या २ सोप्या ट्रिक्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source

25
Image Credit : instagram
नेलपॉलिश रिमूव्हर (Nail Polish Remover)
महिलांकडे नेलपॉलिश रिमूव्हर किंवा त्याचे वाइप्स (Wipes) सहज मिळतात. कापसाच्या बोळ्यावर थोडं रिमूव्हर घ्या आणि किंमत लिहिलेल्या जागेवर हलक्या हाताने पुसून घ्या. काही क्षणांतच तो चिकटपणा किंवा शाईचा डाग न राहता किंमत पूर्णपणे निघून जाईल.
35
Image Credit : Getty
परफ्यूम (Perfume / Body Spray)
घरात नेलपॉलिश रिमूव्हर नसेल, तर तुम्ही परफ्यूम वापरूनही हे काम करू शकता. ज्या ठिकाणी किंमत लिहिली आहे, तिथे थोडा परफ्यूम किंवा बॉडी स्प्रे मारा. त्यानंतर एका कोरड्या टिश्यू पेपरने किंवा सुती कापडाने पुसून टाका. किंमतीचे आकडे सहजपणे निघून जातील.
45
Image Credit : Getty
इस्त्रीची कमाल
इस्त्रीच्या मदतीने गिफ्ट बॉक्स किंवा पुस्तकांवरील प्राईस स्टिकर काढण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे. स्टिकर असलेल्या भागावर एक पातळ पांढरा कागद किंवा सुती कापड ठेवा (यामुळे बॉक्स उष्णतेने जळणार नाही). त्यानंतर, हलकी गरम केलेली इस्त्री त्या कागदावर ठेवून फक्त ५ ते १० सेकंद दाबा. उष्णतेमुळे स्टिकरखालचा डिंक (गम) वितळेल आणि तुम्ही बोटाने ते स्टिकर लोण्यासारखं सहज काढू शकाल.
55
Image Credit : Getty
आता टेन्शन घेण्याची गरज नाही
ही ट्रिक तुम्ही कोणतीही वस्तू गिफ्ट देण्यापूर्वी त्यावरील प्राईस टॅग काढण्यासाठी वापरू शकता. त्यामुळे आता कोणालाही भेटवस्तू देताना किंमत दिसेल याचं टेन्शन घेण्याची अजिबात गरज नाही!