MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Ink Stain Removal : पावडर नको, भिजवणं नको; घरातल्या एका गोष्टीने शाईचा डाग मिनिटांत गायब

Ink Stain Removal : पावडर नको, भिजवणं नको; घरातल्या एका गोष्टीने शाईचा डाग मिनिटांत गायब

तुमच्या आवडत्या शर्टवर पेनाच्या शाईचा डाग लागलाय? टेन्शन घेऊ नका! घरात सहज मिळणाऱ्या एका लिक्विडने हे हट्टी डाग घालवण्याची जादूई ट्रिक इथे वाचा.

2 Min read
Author : Karishma R
Published : Sep 10 2026, 01:41 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
शाईचे डाग काढण्याचा सोपा हॅक
Image Credit : Instagram

शाईचे डाग काढण्याचा सोपा हॅक

शाळेत जाणारी मुलं अनेकदा शर्ट किंवा युनिफॉर्मवर पेनाने रेघोट्या ओढतात. ऑफिसला जाणाऱ्यांच्या खिशात पेनची शाई लिक होऊन कपडे खराब होतात. ही एक अगदी सामान्य समस्या आहे. हे हट्टी डाग काढण्यासाठी आपण कपडे तासन् तास वॉशिंग पावडरमध्ये भिजवून ठेवतो, ब्रशने घासतो किंवा वॉशिंग मशीनमध्ये वेगवेगळे मोड वापरून प्रयत्न करतो. पण आता ही डोकेदुखी संपली आहे. इंटरनेटवर एक सोपा हॅक व्हायरल झालाय, जो पाहून नेटकरी खूश झाले आहेत.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
काय आहे हा 'डेटॉल हॅक'?
Image Credit : Instagram

काय आहे हा 'डेटॉल हॅक'?

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओनुसार, शाईचे डाग काढण्यासाठी तुम्हाला महागडे डिटर्जंट किंवा ब्लीचिंग केमिकलची अजिबात गरज नाही. आपल्या घरातल्या फर्स्ट एड किटमध्ये (First Aid Kit) सहज सापडणारं 'डेटॉल' (Dettol) यावर रामबाण उपाय आहे.

Related Articles

Related image1
Garlic Peeling Hack : तासभर बसायची गरज नाही, फक्त २ मिनिटांत सोला किलोभर लसूण; ही ट्रिक व्हायरल झालीये
35
ही पद्धत कशी वापरायची?
Image Credit : Instagram

ही पद्धत कशी वापरायची?

तयारी - आधी डाग लागलेल्या कपड्याच्या खाली एक जुनं कापड किंवा टिश्यू पेपर ठेवा. यामुळे शाई कपड्याच्या दुसऱ्या बाजूला पसरणार नाही.

डेटॉलचा वापर - शाईच्या डागावर थेट डेटॉलचे काही थेंब टाका.

इअरबडचा वापर - आता एक इअरबड (Earbud) किंवा कापसाचा बोळा घ्या आणि डागावर हलक्या हाताने घासा.

डाग गायब - तुम्ही जसजसं घासाल, तसतशी शाई डेटॉलमध्ये विरघळून इअरबडला चिकटेल आणि कपड्यावरचा डाग पूर्णपणे नाहीसा होईल.

स्वच्छ धुवा - शेवटी, ती जागा साध्या पाण्याने धुवा. तुमचा कपडा पुन्हा नव्यासारखा चमकेल.

45
हे काम कसं करतं?
Image Credit : Instagram

हे काम कसं करतं?

शास्त्रज्ञांच्या मते, बॉलपॉइंट पेनमध्ये वापरली जाणारी शाई तेल आणि सॉल्व्हेंट्स (Solvents) यांचे मिश्रण असते. डेटॉलमध्ये असलेल्या अल्कोहोलमुळे शाईचे कण फुटतात आणि ते सहज विरघळतात. यामुळे कपड्याच्या धाग्यांना कोणतेही नुकसान न होता डाग सहज निघून जातो.
55
ही गोष्ट लक्षात ठेवा
Image Credit : Instagram

ही गोष्ट लक्षात ठेवा

ही पद्धत कॉटन, पॉलिस्टरसारख्या रोजच्या वापरातील कपड्यांसाठी अत्यंत प्रभावी आहे. पण रेशीम (Silk) किंवा खूप नाजूक आणि महागड्या कपड्यांवर हा प्रयोग करण्यापूर्वी, कपड्याच्या आतल्या बाजूला एका छोट्या भागावर पॅच टेस्ट (Patch test) करून पाहणे उत्तम.

तुम्हीही ट्राय करा - कमी खर्चात आणि कमी श्रमात हट्टी डागांपासून सुटका देणारी ही पद्धत गृहिणी, विद्यार्थी आणि नोकरदारांसाठी एक वरदान आहे. तुम्हीही तुमच्या कपड्यांवरील शाईच्या डागाला कंटाळला असाल, तर ही डेटॉलची जादू एकदा नक्की करून पाहा.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Cucumber Benefits : काकडी सालासह खावी की सोलून? जाणून घ्या योग्य पद्धत
Recommended image2
Old Photos : तुमच्या घरातल्या जुन्या फोटोंमध्ये लपलेल्या ७ रंजक गोष्टी!
Recommended image3
Reincarnation Study : मृत्यू आणि पुनर्जन्मात असतो १६ महिन्यांचा गॅप, व्हर्जिनिया युनिव्हर्सिटीच्या अभ्यासात मोठा खुलासा
Recommended image4
Lightweight Gold Necklaces : 1 तोळ्याच्या आत मिळणारे सुंदर आणि हलके सोन्याचे नेकलेस
Recommended image5
Kitchen Brush Cleaning : डोशाच्या ब्रशचा चिकटपणा काढण्याची सोपी ट्रिक
Related Stories
Recommended image1
Garlic Peeling Hack : तासभर बसायची गरज नाही, फक्त २ मिनिटांत सोला किलोभर लसूण; ही ट्रिक व्हायरल झालीये
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved