MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Garlic Peeling Hack : तासभर बसायची गरज नाही, फक्त २ मिनिटांत सोला किलोभर लसूण; ही ट्रिक व्हायरल झालीये

Garlic Peeling Hack : तासभर बसायची गरज नाही, फक्त २ मिनिटांत सोला किलोभर लसूण; ही ट्रिक व्हायरल झालीये

बोटांना त्रास न देता, फक्त २ मिनिटांत किलोभर लसूण सोलण्याची एक सोपी ट्रिक सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाली आहे. यासाठी तुम्हाला फक्त एक लाटणं लागेल.

2 Min read
Author : Karishma R
Published : Sep 08 2026, 05:54 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
बोटं दुखल्याशिवाय लसूण सोला
Image Credit : riyakitchen Instagram

बोटं दुखल्याशिवाय लसूण सोला

सांबार, भाजी किंवा कोणताही पदार्थ बनवताना लसूण सोलणं एक मोठं आव्हान असतं. नखांनी एक-एक पाकळी सोलताना बोटं तर दुखतातच, पण हाताला लसणाचा उग्र वासही राहतो. जास्त लसूण हवा असेल तर अर्धा तास त्यातच जातो. पण, किचन टॉवेल आणि पोळीच्या लाटण्याचा वापर करून काही क्षणांत लसूण सोलण्याची एक सुपर आयडिया नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
किचन टॉवेल आणि चपाती लाटणे
Image Credit : riyakitchen Instagram

किचन टॉवेल आणि चपाती लाटणे

ही ट्रिक वापरण्यासाठी तुम्हाला फक्त दोन गोष्टी लागतील - एक किचन टॉवेल आणि पोळ्या करायचं लाटणं. या साध्या वस्तू वापरून तुम्ही काही मिनिटांत किलोभर लसूण सोलून मोकळे होऊ शकता. चला तर मग, ही व्हायरल ट्रिक कशी काम करते ते पाहूया.

Related Articles

Related image1
Tight Jeans : फॅशनच्या नादात आरोग्याशी खेळ? टाइट जीन्स घालताय? मग हे धोके नक्की वाचा
34
ही आहे लसूण सोलण्याची पद्धत
Image Credit : riyakitchen Instagram

ही आहे लसूण सोलण्याची पद्धत

अशी आहे लसूण सोलण्याची पद्धत - 

थोडं तेल लावा - सगळ्यात आधी लसणाच्या गड्ड्यातून पाकळ्या वेगळ्या करा आणि त्यावर काही थेंब तेल टाकून चांगलं मिक्स करून घ्या. टॉवेलमध्ये गुंडाळा: तेल लावलेल्या लसणाच्या पाकळ्या एका स्वच्छ किचन टॉवेल (Kitchen towel) किंवा जाड सुती कापडात गुंडाळा. हलकेच आपटा: कापडाची पुरचुंडी करून, जसं आपण कपडे धुताना आपटतो, तसं जमिनीवर किंवा ओट्यावर हलक्या हाताने एक-दोन वेळा आपटा.

लाटण्याने लाटा - त्यानंतर ते कापड तसंच जमिनीवर पसरून, पोळीच्या लाटण्याने (Rolling Pin) त्यावर हलकेच एक-दोन वेळा लाटा.

44
निकाल
Image Credit : riyakitchen Instagram

निकाल

किचन टॉवेल उघडून पाहिल्यावर लसणाची सालं पूर्णपणे निघालेली दिसतील. एकही साल न लागलेल्या स्वच्छ लसणाच्या पाकळ्या तुम्ही सहजपणे वेगळ्या करून, वाटीत काढून स्वयंपाकासाठी वापरू शकता. नखं न दुखवता आणि बोटांना वास न लागू देता, काही क्षणांत काम पूर्ण करणारी ही सोपी आयडिया गृहिणींना खूप आवडली आहे आणि सोशल मीडियावर तिला प्रचंड पसंती मिळत आहे.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Wash Sneakers In Washing Machine : वॉशिंग मशीनमध्ये शूज धुताय? मग या चुका टाळा
Recommended image2
Sweet Potato Benefits : रताळे खाण्याचे 7 भन्नाट फायदे
Recommended image3
Dates Soaked In Milk : दुधात भिजवलेले खजूर खाण्याचे 7 भन्नाट फायदे
Recommended image4
Blood Pressure Control Diet : बीपी कंट्रोलमध्ये ठेवायचाय? मग आहारात करा या 7 पदार्थांचा समावेश
Recommended image5
Kidney Damage Symptoms : किडनी खराब होण्याआधी शरीर देतं 'ही' पूर्वसूचना, दुर्लक्ष करू नका
Related Stories
Recommended image1
Tight Jeans : फॅशनच्या नादात आरोग्याशी खेळ? टाइट जीन्स घालताय? मग हे धोके नक्की वाचा
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved