सार

Zero Rupee Note : आपण सर्वांनीच 10 रूपयांपासून ते 2 हजार रूपयांपर्यंतची नोट पाहिली आहे. पण कधी शून्य रूपयाची नोट पाहिली आहे का? पण भारतात शून्य रूपयाचीही नोट का छापावी लागली? जाणून घेऊया यामागील संपूर्ण कहाणी…

 

Zero Rupee Note News : आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला भारतीय चलनांची माहिती आहेच. कारण दैनंदिन जीवनात पैशांच्या व्यवहाराशिवाय एकही गोष्ट पूर्ण होऊ शकत नाही. पण आपण कधी शून्य रूपयाची नोट पाहिली आहे का?

शून्य रूपयांच्या नोटेबद्दल ऐकून तुम्हालाही धक्का बसेल ना. धक्का बसणं साहजिकच आहे, कारण शून्य रूपयाच्या नोट म्हणजे ज्यास काही किंमतच नाही, अशा नोटेबद्दल काय चर्चा करणार? ऐकून जरा विचित्रच वाटेल पण ही बाब देखील खरी आहे की आपल्या देशामध्ये शून्य रूपयाची नोट देखील छापण्यात आली होती. इतकंच नव्हे तर या नोटांचे लोकांमध्ये वाटपही करण्यात आले होते. 

कधी छापण्यात आली होती नोट?

वर्ष 2007मध्ये एका NGOकडून शून्य रूपयाची नोट छापण्यात आली होती. या शून्य रुपयाच्या नोटेवर सरकार किंवा रिझर्व्ह बँकेकडून कोणत्याही प्रकारची हमी दिल्याचा उल्लेख नव्हता. शिवाय ही शून्य रूपयाची नोट कधीही चलनातही आली नाही. तरीही हजारोंच्या संख्येमध्ये नोटांचे वाटप करून एक अनोखा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ही नोट हिंदी, तमिळ, कन्नड, तेलुगू आणि मल्याळम भाषेत छापण्यात आली होती.

शून्य रूपयाची नोट या कारणामुळे छापावी लागली?

देशभरातील सरकारी कार्यालयांमध्ये भ्रष्टाचाराने कळस गाठला होता. सर्वसामान्यांना प्रत्येक कामासाठी अधिकचे पैसे द्यावे लागत असल्याची चर्चा होती. अशा स्थितीत एनजीओने लाचखोरी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात एक मोहीम सुरू केली व शून्य रूपयाच्या नोटा छापल्या. या नोटा रेल्वे स्थानक, बसस्थानक आणि बाजारपेठांमध्ये चिकटवल्या गेल्या शिवाय वाटप देखील करण्यात आले. जेणेकरून भ्रष्टाचाराची किड समूळ नष्ट करण्यासाठी जागरूकता निर्माण होण्यास मदत मिळेल.

अशी होती शून्य रूपयाची नोट

शून्य रूपयाची नोट दिसायला अगदी 50 रूपयाच्या नोटेप्रमाणेच होती. त्यावर 'मी कधीही लाच घेणार नाही आणि देणार नाही' असे शब्दही छापण्यात आले होते. एनजीओने शून्य रूपयाच्या सर्वप्रथम तब्बल 25 हजार नोटा छापल्या आणि त्या लोकांमध्ये वाटल्या. ही मोहीम वर्ष 2014पर्यंत चालवण्यात आली आणि लाचखोरीविरोधात जगजागृतीचे काम करण्यात आले.

आणखी वाचा :

VIRAL VIDEO : पोलीस अधिकाऱ्याने गायलं अ‍ॅनिमल सिनेमाचे गाणे, सुरेल आवाज ऐकून लोक म्हणाले - ‘तुम्ही बॉलिवूडमध्ये असायला हवे’

Inspirational Story : धीरूभाई अंबानींचे संपूर्ण कुटुंब 1BHK फ्लॅटमध्ये राहते होते, पगार होता केवळ 300 रुपये

गाजर हलव्यामध्ये दूध मिक्स करताना करू नका ही चूक, अन्यथा बिघडेल चव