MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Travel : महाराष्ट्रातील ही 5 ठिकाणे आहेत मिनी गोवा, वर्षाअखेरीस नक्की भेट द्या

Travel : महाराष्ट्रातील ही 5 ठिकाणे आहेत मिनी गोवा, वर्षाअखेरीस नक्की भेट द्या

Travel : गोव्याला जाणं शक्य नसेल तर महाराष्ट्रातील ‘मिनी गोवा’ ठिकाणं उत्तम पर्याय ठरू शकतात. अलिबाग, मालवण, वेंगुर्ला, गणपतीपुळे आणि हरिहरेश्वर ही ठिकाणं स्वच्छ समुद्रकिनारे, निसर्गसौंदर्य आणि शांत वातावरणामुळे गोव्याची आठवण करून देतात.

2 Min read
Chanda Mandavkar
Published : Dec 24 2025, 11:00 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
महाराष्ट्रातील मिनी गोवा
Image Credit : Getty

महाराष्ट्रातील मिनी गोवा

गोवा म्हटलं की डोळ्यासमोर येतात निळाशार समुद्रकिनारे, वाळूवरची मऊ रेती, नारळाची झाडं आणि निवांत वातावरण. मात्र गोव्याला जाणं प्रत्येक वेळी शक्यच होईल असं नाही. पण काळजी करू नका! महाराष्ट्रातच अशी काही ठिकाणं आहेत जी सौंदर्य, समुद्रकिनारे आणि शांत वातावरणामुळे ‘मिनी गोवा’ म्हणून ओळखली जातात. निसर्गसौंदर्याने नटलेली ही ठिकाणं पर्यटकांना गोव्याची आठवण करून देतात. चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील अशीच 5 सुंदर ‘मिनी गोवा’ ठिकाणं.

26
अलिबाग
Image Credit : Getty

अलिबाग

अलिबाग हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध पर्यटनस्थळांपैकी एक असून याला ‘मिनी गोवा’ असंही म्हटलं जातं. मुंबईपासून अवघ्या काही तासांच्या अंतरावर असलेलं अलिबाग स्वच्छ समुद्रकिनारे, नारळ-सुपारीची झाडं आणि शांत वातावरणासाठी ओळखलं जातं. अलिबाग बीच, नागाव बीच, किहीम बीच हे पर्यटकांचे विशेष आकर्षण आहेत. पाण्यातील खेळ, बोटिंग, किल्ले आणि समुद्रात मावळणारा सूर्य पाहण्याचा अनुभव येथे अविस्मरणीय असतो. वीकेंड ट्रिपसाठी अलिबाग उत्तम पर्याय मानला जातो.

Related Articles

Related image1
Winter season: या सुट्टीत शहराच्या गजबजाटापासून दूर, शांत रंगबुल गावाला भेट द्या
Related image2
Content Creators साठी 5 बेस्ट स्मार्टफोन, रिल्स प्रोफेशनल दिसण्यासह होतील व्हायरल
36
मालवण
Image Credit : Getty

मालवण

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण हे खऱ्या अर्थाने मिनी गोवा म्हणून ओळखले जाते. निळसर समुद्र, स्वच्छ किनारे आणि जलक्रीडा यामुळे मालवण पर्यटकांच्या पसंतीस उतरते. तारकर्ली बीच, देवबाग बीच आणि सिंधुदुर्ग किल्ला ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत. स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्केलिंगसारख्या जलक्रीडांसाठी मालवण प्रसिद्ध आहे. यासोबतच मालवणी खाद्यसंस्कृती, विशेषतः समुद्री पदार्थ, पर्यटकांना वेगळाच अनुभव देतात.

46
वेंगुर्ला
Image Credit : Getty

वेंगुर्ला

गोव्याच्या सीमेलगत वसलेले वेंगुर्ला हे निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग आहे. अजूनही फारशी व्यापारीकरण न झालेली ही जागा शांतता आणि निसर्गसौंदर्यासाठी ओळखली जाते. वेंगुर्ला बीच, शिरोडा बीच आणि रेडी बीच हे येथील प्रमुख समुद्रकिनारे आहेत. निळसर पाणी, मऊ वाळू आणि आजूबाजूची हिरवळ यामुळे येथे आल्यावर गोव्यात आल्याचा भास होतो. शांत सुट्टी घालवू इच्छिणाऱ्यांसाठी वेंगुर्ला उत्तम ठिकाण आहे.

56
हरिहरेश्वर
Image Credit : pinterest

हरिहरेश्वर

रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर हे कमी गर्दीचं पण अत्यंत सुंदर पर्यटनस्थळ आहे. चारही बाजूंनी समुद्र आणि हिरवळ असलेलं हे ठिकाण मिनी गोवा म्हणून ओळखलं जातं. स्वच्छ समुद्रकिनारा, नारळाची झाडं आणि शांत वातावरण यामुळे येथे मनाला विशेष शांती मिळते. हरिहरेश्वर मंदिर, कॅल्म बीच आणि निसर्गरम्य परिसर पर्यटकांना आकर्षित करतो. गर्दीपासून दूर राहून निवांत वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण योग्य आहे.

66
गणपतीपुळे
Image Credit : Social Media

गणपतीपुळे

रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे हे धार्मिक तसेच पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. समुद्रकिनाऱ्यालगत असलेले श्री गणपती मंदिर हे येथील मुख्य आकर्षण आहे. स्वच्छ आणि लांब समुद्रकिनारा, शांत वातावरण आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे गणपतीपुळे मिनी गोवा म्हणून ओळखले जाते. येथे पाण्यातील खेळ, समुद्रकिनारी फेरफटका आणि निसर्गाचा आनंद घेता येतो. कुटुंबासोबत सुट्टी घालवण्यासाठी हे ठिकाण अतिशय योग्य आहे.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
2026 मध्ये अनेक संधी, या 5 नशीबवान राशींचे भाग्य उजळणार, होईल पैशांचा पाऊस!
Recommended image2
Horoscope 24 December : आज बुधवारचे राशिभविष्य, या राशीच्या लोकांसाठी विवाहबाह्य संबंध त्रासाचे कारण बनेल!
Recommended image3
विंटेज+मॉडर्न चार्म! ट्राय करा अदिती राव हैदरीच्या 7 हेअरस्टाईल्स
Recommended image4
ख्रिसमस गिफ्टवर 80% पर्यंत सूट, 300 रुपयांत खरेदी करा 3 गिफ्ट्स
Recommended image5
Winter season: या सुट्टीत शहराच्या गजबजाटापासून दूर, शांत रंगबुल गावाला भेट द्या
Related Stories
Recommended image1
Winter season: या सुट्टीत शहराच्या गजबजाटापासून दूर, शांत रंगबुल गावाला भेट द्या
Recommended image2
Content Creators साठी 5 बेस्ट स्मार्टफोन, रिल्स प्रोफेशनल दिसण्यासह होतील व्हायरल
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved