सार
तिरुपती बालाजीचे मंदिर जगप्रसिद्ध आहे. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी दूरवरुन भाविक वर्षभर येत राहतात. येथे दर्शनासाठी फार मोठी गर्दीही झाल्याचे दिसून येते. अशातच तिरुपती मंदिरात व्हीआयपी दर्शनाच्या सुविधेचा लाभ घेऊ शकता.
Tirupati Balaji VIP Darshan Booking Process : जगप्रसिद्ध असणाऱ्या तिरुपती बालाजीचे मंदिर कोणाला माहिती नाही. येथे दर्शनसाठी भाविकांनी खूप गर्दी होते. अशातच दर्शनासाठी लहान मुलं ते वयोवृद्धांपर्यंतच्या भाविकांना सोबत घेऊन जाणे थोडं कठीण होते. पण तुम्ही व्हीआयपी दर्शनाच्या सुविधेचा फायदा घेऊ शकता. यासाठी कुठे जाण्याची गरज नसून घरबसल्याच व्हीआयपी दर्शनाच्या सुविधेसाठी बुकिंग करू शकता.
तिरुपती बालाजीचे दर्शन
तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी तिरुमाला तिरुपती देवस्थानम बोर्डाने श्रीवण ट्रस्टसोबत मिळून काम करण्याचे ठरवले आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून देशभरातील शहर, जिल्हा किंवा गावातील नव्या मंदिरांची उभारणी करणे आणि सनातन धर्माला पुढे नेण्यासाठी तयार केले आहे. भक्तांना दर्शनावेळी होणारा त्रास पाहता व्हीआयपी दर्शनाची सुविधा सुरू केली आहे. या दर्शनासाठी प्रत्येक भाविकाला शुल्क मोजावे लागणार आहेत.
व्हीआयपी दर्शनासाठी शुल्क किती?
व्हीआयपी दर्शनासाठी प्रति व्यक्तीनुसार शुल्क द्यावा लागणार आहे. यामुळे व्हीआयपी दर्शनावेळी तुमचा खर्च कोणत्या दिवशी जाणार आणि वेळ यावर अवलंबून आहे. व्हीआयपी तिकीटाची रक्कम प्रत्येक दिवशी आणि वेळेनुसार बदललेली असू शकते. यामुळे तिरुपती बालाजी मंदिराची अधिकृत वेबसाइट https://ttdevasthanams.ap.gov.in/home/dashboard येथे भेट द्या.
असा घ्या सुविधेचा लाभ
- तिरुपती बालाजी मंदिराच्या अधिकृत वेबसाइटवर अन्य काही ऑनलाइन सुविधांचे पर्याय दिले जातील. यामध्ये स्पेशल दर्शनच्या पर्यायावर क्लिक करा. लॉग इन करुन मोबाइल क्रमांक आणि ओटीपी भरा.
- ऑनलाइन अर्जाचा फॉर्म स्क्रिनवर दाखवला जाईल. येथे नाव, महत्वाची माहिती द्यावी लागेल.
- ओखळपत्र अपलोड करुन दर्शनसाठीची तारीख आणि वेळ निवडा.
- दर्शनासाठी शुल्क 500 रुपये ते 10 हजार रुपयांपर्यंत प्रति व्यक्ती खर्च येईल.
- शुल्क भरल्यानंतर कन्फर्म दर्शनाची रिसिप्ट येईल. याची प्रिंट काढून दर्शनावेळी दाखवा. यावेळी महत्वाची कागदपत्रेही सोबत घेऊन जाण्यास विसरू नका.
आणखी वाचा :
शरिराला आतमधून गरम ठेवतील हे 3 मसाले, असा करा पदार्थांमध्ये वापर
वयाच्या 40 नंतर महिलांनी डाएटमध्ये करा या 6 पोषण तत्त्वांचा समावेश, रहाल हेल्दी