MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Reels Addiction : सतत रील्स बघताय? तुमच्या आरोग्यासह, खिशालाही असं पडतंय भगदाड

Reels Addiction : सतत रील्स बघताय? तुमच्या आरोग्यासह, खिशालाही असं पडतंय भगदाड

'फक्त एक रील बघूया' असं म्हणून फोन हातात घेतला की तास-न्-तास कसे जातात कळत नाही. पण तुम्हाला माहितीये का? ही सवय फक्त तुमचा वेळच नाही, तर तुमचं आरोग्य, मानसिक शांतता, कामावरचा परफॉर्मन्स आणि आर्थिक परिस्थितीवरही गंभीर परिणाम करते.

3 Min read
Author : Karishma R
Published : Aug 14 2026, 01:16 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
रील्सचं व्यसन का लागतं?
Image Credit : Lava.com

रील्सचं व्यसन का लागतं?

रील्सच्या आकर्षणामागे आपल्या मेंदूची भूमिका महत्त्वाची असते. आपल्याला आवडणारा किंवा आश्चर्यचकित करणारा व्हिडीओ दिसला की मेंदूत 'डोपामाइन' नावाचं केमिकल रिलीज होतं. त्यामुळे आपल्याला आनंदी वाटतं. तोच आनंद पुन्हा मिळवण्यासाठी आपण एकानंतर एक रील बघत जातो. पुढचा व्हिडीओ कसा असेल याची उत्सुकताही आपल्याला खिळवून ठेवते. एक व्हिडीओ संपायच्या आत दुसरा आपोआप सुरू झाल्यामुळे थांबण्याचा विचारही मनात येत नाही. यामुळे तासन्तास रील्स बघण्यात वेळ वाया जातो.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
रील्समुळे आरोग्य आणि आर्थिक परिस्थितीला कसा फटका बसतो?
Image Credit : Getty

रील्समुळे आरोग्य आणि आर्थिक परिस्थितीला कसा फटका बसतो?

कामावर लक्ष कमी होतं - जास्त वेळ रील्स बघितल्यामुळे कोणत्याही कामावर जास्त वेळ लक्ष केंद्रित करणं कठीण होतं. ऑफिसमध्ये काम करतानाही अनेकजण मध्येच रील्स बघतात. यामुळे कामाची गुणवत्ता आणि उत्पादकता (Productivity) दोन्ही कमी होते. एका अभ्यासानुसार, भारतीय त्यांच्या स्मार्टफोन वापराच्या वेळेपैकी जवळपास पाचवा हिस्सा शॉर्ट व्हिडीओंवर घालवतात. तसंच, 64 टक्के लोकांनी मान्य केलंय की ते पूर्वीपेक्षा आता जास्त रील्स बघत आहेत.

गरज नसताना खर्च आणि कर्जाचा धोका - सोशल मीडिया अल्गोरिदम आपल्याला आवडणाऱ्या वस्तूंच्या जाहिराती आणि व्हिडीओ जास्त दाखवतं. त्यामुळे गरज नसतानाही ती वस्तू लगेच खरेदी करण्याची इच्छा होते. यालाच 'इम्पल्स बाइंग' (Impulse Buying) म्हणतात. यामुळे बचत कमी होते आणि क्रेडिट कार्ड किंवा वैयक्तिक कर्जावर अवलंबून राहण्याची शक्यता वाढते. हे भविष्यात आर्थिक तणावाला कारणीभूत ठरू शकतं.

तरुणांच्या कौशल्य विकासावर परिणाम - शिक्षण, नवीन कौशल्यं शिकणं आणि करिअरच्या विकासासाठी लागणारा वेळ अनेकजण रील्स बघण्यात घालवत आहेत. एका अभ्यासानुसार, Gen Z मधील 89 टक्के तरुण दररोज रील्स बघतात. यातील अनेकजण दिवसाला दोन तासांपेक्षा जास्त वेळ शॉर्ट व्हिडीओ बघत असल्याचं रिपोर्ट सांगतात. हाच वेळ जर नवीन कौशल्यं शिकण्यासाठी वापरला, तर त्याचा फायदा केवळ वैयक्तिकच नाही, तर देशाच्या आर्थिक विकासालाही होईल.

Related Articles

Related image1
Stress Relief Foods : ताण-तणाव होतोय? मग दिवसभरात खा हे 7 पदार्थ, लगेच फरक जाणवेल
Related image2
Shower Thoughts : शॉवर घेताना खरंच भन्नाट आयडिया का सुचतात? 'शॉवर थॉट्स'चा कसा फायदा होतो?
34
मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम
Image Credit : Getty

मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम

तासन्तास सतत रील्स किंवा सोशल मीडिया स्क्रोल करण्याला 'डूम स्क्रोलिंग' (Doom Scrolling) म्हणतात. यामुळे निद्रानाश, चिंता, नैराश्य आणि मानसिक थकवा यांसारख्या समस्या वाढू शकतात. मानसिक आरोग्य बिघडल्यास नोकरीतील गैरहजेरी वाढते आणि कामाचा दर्जा घसरतो. याचा परिणाम वैयक्तिक उत्पन्नावर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवरही होतो.

चुकीचे गुंतवणुकीचे सल्ले - रील्सवर अनेकजण स्टॉक मार्केट, क्रिप्टो, म्युच्युअल फंड आणि व्यवसायाच्या संधींबद्दल कमी वेळेत मोठा नफा मिळवून देण्याचं आश्वासन देतात. पण असे व्हिडीओ बनवणाऱ्यांपैकी अनेकांकडे योग्य पात्रता किंवा अधिकृत परवाना नसतो. ते फक्त व्ह्यूज, लाईक्स आणि स्पॉन्सरशिपसाठी कोणत्याही रिसर्चशिवाय गुंतवणुकीचे सल्ले देतात. त्यांच्यावर विश्वास ठेवून गुंतवणूक केल्यास पैसे गमावण्याचा धोका जास्त असतो.

44
रील्सच्या सवयीवर नियंत्रण कसे मिळवावे?
Image Credit : gemini

रील्सच्या सवयीवर नियंत्रण कसे मिळवावे?

रील्स बघणं पूर्णपणे थांबवणं प्रत्येकाला शक्य नसतं. पण काही सवयी बदलल्यास या समस्येवर मात करता येते.

वेळेचं बंधन ठरवा - रील्स बघण्यासाठी दिवसातून फक्त 15 ते 20 मिनिटांचा वेळ ठरवा.

नोटिफिकेशन्स बंद करा - सोशल मीडिया नोटिफिकेशन्स बंद केल्यास विनाकारण ॲप उघडण्याची सवय कमी होते.

चांगल्या सवयी लावा - रिकाम्या वेळेत पुस्तकं वाचणं, चालणं, व्यायाम करणं, संगीत ऐकणं, कुटुंबासोबत वेळ घालवणं यांसारखी कामं करा.

डिजिटल डिटॉक्स करा - आठवड्यातून किमान एक दिवस सोशल मीडियापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.

स्वतःला प्रश्न विचारा - 'आत्ता रील्स बघणं खरंच गरजेचं आहे का? हा वेळ अभ्यासासाठी किंवा कामासाठी वापरला तर?' असा विचार करण्याची सवय लावा.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
उपयुक्तता बातम्या
जीवनशैली बातम्या
Recommended Stories
Recommended image1
Bridal Jewellery : लग्नात सर्वांचच लक्ष वेधतील दागिने, पाहा नव-नवधूसाठी खास ज्वेलरी डिझाइन्स
Recommended image2
Bangle Designs : बांगड्यांचे लेटेस्ट डिझाइन्स, साडी-ड्रेस कोणत्याही लूकवर सूट होतील
Recommended image3
Fridge Maintenance : फ्रीज वापरताना या 8 चुका टाळा, लाईट बिल वाचवा!
Recommended image4
Bracelets : राखीसाठी भावाला द्या हटके गिफ्ट, पाहा मुलांसाठी गोल्ड प्लेटेड ब्रेसलेट डिझाइन्स
Recommended image5
Silver Anklets : रोजच्या वापरासाठी चांदीच्या पैंजणांचे बेस्ट डिझाइन्स, एकदा बघाच
Related Stories
Recommended image1
Stress Relief Foods : ताण-तणाव होतोय? मग दिवसभरात खा हे 7 पदार्थ, लगेच फरक जाणवेल
Recommended image2
Shower Thoughts : शॉवर घेताना खरंच भन्नाट आयडिया का सुचतात? 'शॉवर थॉट्स'चा कसा फायदा होतो?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved