MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Shower Thoughts : शॉवर घेताना खरंच भन्नाट आयडिया का सुचतात? 'शॉवर थॉट्स'चा कसा फायदा होतो?

Shower Thoughts : शॉवर घेताना खरंच भन्नाट आयडिया का सुचतात? 'शॉवर थॉट्स'चा कसा फायदा होतो?

ऑफिसच्या कामाने डोकं भंडावून गेलंय? एखादी चांगली आयडियाच सुचत नाहीये? कितीही विचार करून डोकं शिणलंय? मग तज्ज्ञ सांगतात, थोडा वेळ काम बाजूला ठेवा आणि मस्तपैकी शॉवर घ्या.

2 Min read
Author : Karishma R
Published : Aug 11 2026, 04:57 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
गरम पाण्याने शॉवर घेताना कल्पना सुचतात?
Image Credit : Getty

गरम पाण्याने शॉवर घेताना कल्पना सुचतात?

तासनतास विचार करूनही न सुचलेल्या कल्पना गरम पाण्याने शॉवर घेताना सुचतात. यालाच 'शॉवर थॉट्स' म्हणतात. हे नेमकं काय आहे आणि याचे फायदे काय?

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
मेंदू 'ऍक्टिव्ह थिंकिंग'मधून बाजूला होतो
Image Credit : Getty

मेंदू 'ऍक्टिव्ह थिंकिंग'मधून बाजूला होतो

'सायकॉलॉजी टुडे' (Psychology Today) च्या एका लेखानुसार, जेव्हा आपण मेंदूला एखादं काम करण्यासाठी जास्त जोर देत नाही, तेव्हा त्याला मोकळेपणाने विचार करण्याची संधी मिळते. चालणं, व्यायाम करणं, किंवा शॉवर घेणं यांसारख्या क्रिया करताना मेंदू 'ऍक्टिव्ह थिंकिंग'मधून थोडा बाजूला होतो. त्यामुळे बॅकग्राउंडला सुरू असलेल्या आयडिया अचानक आपल्या जागृत मनात येतात आणि आपल्याला समस्येवर उपाय सापडतो. आजच्या डिजिटल युगात शांतता मिळणं खूप अवघड आहे. पण शॉवरखाली असताना कोणताही फोन किंवा डिस्टर्बन्स नसतो. त्यामुळे ऑफिसच्या डेस्कवर डोकं फोडून न सुचलेली आयडिया, इथे शांतपणे सुचते.

Related Articles

Related image1
Stress Eating : तुम्हाला स्ट्रेस आलाय? मग हे ४ पदार्थ खाणं टाळा, नाहीतर चिंता आणखी वाढेल
Related image2
Home Cleaning : फरशी पुसायची योग्य वेळ कोणती? सकाळी की संध्याकाळी?
34
स्नायू रिलॅक्स होतात, तणाव कमी होतो
Image Credit : Gemini Ai

स्नायू रिलॅक्स होतात, तणाव कमी होतो

गरम पाण्याने आंघोळ केल्याने शरीराला खूप आराम मिळतो. स्नायू रिलॅक्स होतात आणि तणाव कमी होतो. जेव्हा शरीर शांत होतं, तेव्हा मनही रिलॅक्स होतं. 'द बेटर बाथ'च्या रिपोर्टनुसार, गरम पाण्याने आंघोळ केल्यावर आपलं शरीर 'डोपामाइन' (Dopamine) नावाचं केमिकल रिलीज करतं. यामुळे आपला मूड तर सुधारतोच, पण वेगवेगळ्या आयडिया एकमेकांशी जोडण्यासही मदत मिळते. यामुळेच विचार करण्याची पद्धत बदलते आणि नवीन उपाय सुचतात.
44
मेंदू बाहेरच्या जगातून हटून विचारांवर केंद्रित करतो
Image Credit : Gemini Ai

मेंदू बाहेरच्या जगातून हटून विचारांवर केंद्रित करतो

जेव्हा आपण एकाच समस्येवर सतत लक्ष केंद्रित करतो, तेव्हा आयडिया सुचत नाहीत. थोडा ब्रेक दिल्यास सुप्त मनाला काम करण्याची संधी मिळते. शॉवर घेताना आपण शरीर स्वच्छ करण्यासारख्या दुसऱ्या कामात व्यस्त असतो, पण बॅकग्राउंडला आपला मेंदू मुख्य समस्येवर काम करतच असतो. शॉवरमधून पडणाऱ्या पाण्याचा लयबद्ध आवाज बाहेरचे आवाज बंद करतो. यामुळे मेंदूचं लक्ष बाहेरच्या जगातून हटून आतल्या विचारांवर केंद्रित होतं. म्हणूनच, पुढच्या वेळी एखादी समस्या सुटत नसेल, तर जास्त टेंशन न घेता एक हॉट वॉटर शॉवर घ्या. तुम्हाला आपोआप उत्तर सापडू शकतं.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Fever Bathing : ताप आल्यावर अंघोळ करावी का? जाणून घ्या 5 महत्त्वाच्या गोष्टी
Recommended image2
Tulsi Plant : रविवारी आणि एकादशीला तुळशीला पाणी का घालू नये? या ४ चुका टाळाच
Recommended image3
Chia Seeds Benefits : चिया सीड्स खाल्ल्याने खरंच वजन कमी होतं का?
Recommended image4
Gajakesari Yoga : आला गजकेसरी योग! या 5 राशींचं नशीब फळफळणार, होणार पैशांचा पाऊस
Recommended image5
Turmeric Tea : हळदीचा चहा पिण्याचे 7 आरोग्यदायी फायदे
Related Stories
Recommended image1
Stress Eating : तुम्हाला स्ट्रेस आलाय? मग हे ४ पदार्थ खाणं टाळा, नाहीतर चिंता आणखी वाढेल
Recommended image2
Home Cleaning : फरशी पुसायची योग्य वेळ कोणती? सकाळी की संध्याकाळी?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved