Samsung Galaxy S25 Ultra : सॅमसंगचा फ्लॅगशिप फोन Galaxy S25 Ultra क्रोमाच्या सेलमध्ये निम्म्या किमतीत उपलब्ध आहे. या ऑफरमुळे, १,२९,९९९ चा हा फोन ६९,९९९ रुपयांपासून खरेदी करता येत असून, ग्राहकांना ६०,००० रुपयांपर्यंतची बचत करण्याची संधी मिळत आहे.
Samsung Galaxy S25 Ultra Price Cut : स्मार्टफोनप्रेमींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. सॅमसंगचा फ्लॅगशिप फोन Galaxy S25 Ultra याच्या किमतीत आतापर्यंतची सर्वात मोठी कपात करण्यात आली आहे. Samsung Galaxy S26 च्या लॉन्चआधीच हा प्रीमियम फोन जवळपास निम्म्या किमतीत खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे. टाटा क्रोमा (Croma) च्या वेबसाइटवर आणि देशभरातील ऑफलाइन स्टोअर्समध्ये सुरू असलेल्या Chromatic Year-End Sale दरम्यान ही खास ऑफर उपलब्ध आहे. ही सेल ४ जानेवारी २०२६ पर्यंत चालणार आहे.
किंमत किती झाली?
Samsung Galaxy S25 Ultra भारतात १,२९,९९९ रुपये या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च झाला होता. मात्र सध्या क्रोमाच्या सेलमध्ये हा फोन ६९,९९९ रुपयांपासून उपलब्ध आहे. याशिवाय बँक डिस्काउंट, एक्सचेंज ऑफर आणि अतिरिक्त बोनस एकत्र केल्यास ग्राहकांना ६० हजार रुपयांपर्यंतची थेट बचत करता येऊ शकते. ऑफर्सची अचूक माहिती जाणून घेण्यासाठी ग्राहकांनी Croma च्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दमदार डिस्प्ले आणि जबरदस्त कॅमेरा
या स्मार्टफोनमध्ये ६.९-इंचाचा Dynamic AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला असून त्याला Quad HD+ (3120 x 1440) रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट मिळतो. गेमिंग, व्हिडिओ स्ट्रीमिंग किंवा रोजच्या वापरासाठी हा डिस्प्ले उत्कृष्ट अनुभव देतो. कॅमेऱ्याच्या बाबतीतही Galaxy S25 Ultra जबरदस्त आहे. यात 200MP मुख्य कॅमेरा, 50MP अल्ट्रा-वाइड लेन्स, 50MP टेलिफोटो कॅमेरा देण्यात आला आहे, ज्यामुळे प्रो-लेव्हल फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी शक्य होते.
बॅटरी, प्रोसेसर आणि परफॉर्मन्स
फोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी असून ती 45W फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. परफॉर्मन्ससाठी यात Qualcomm Snapdragon 8 Elite प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन Android 15 आधारित One UI 7 वर चालतो. मल्टीटास्किंग आणि हेवी गेमिंगसाठी यात 12GB RAM आणि 1TB पर्यंत स्टोरेजचा पर्याय उपलब्ध आहे.
जर तुम्ही प्रीमियम स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर Samsung Galaxy S25 Ultra वर मिळणारी ही ऑफर चुकवण्यासारखी नाही. इतक्या मोठ्या डिस्काउंटसह हा फोन सध्या भारतात सर्वात फायदेशीर डीलपैकी एक ठरत आहे.


