MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Tech Tips : तुमच्या फोनचा चार्जर ओरिजल आहे की नाही? ओळखण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Tech Tips : तुमच्या फोनचा चार्जर ओरिजल आहे की नाही? ओळखण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Tech Tips : नकली चार्जर वापरणे धोकादायक ठरू शकते. पॅकेजिंग, लोगो, वजन, वायरची जाडी आणि चार्जिंग स्पीड पाहून ओरिजिनल चार्जर सहज ओळखता येतो. नेहमी अधिकृत दुकानातूनच चार्जर घ्यावा, कारण तोच तुमच्या फोनची बॅटरी आणि सुरक्षिततेसाठी सर्वोत्तम पर्याय आहे.

2 Min read
Chanda Mandavkar
Published : Nov 06 2025, 01:45 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
नकली चार्जरचा धोका किती मोठा आहे?
Image Credit : social media

नकली चार्जरचा धोका किती मोठा आहे?

आजच्या स्मार्टफोन युगात चार्जर हा सर्वात वापरला जातो. मात्र, बाजारात स्वस्त आणि दिसायला अगदी सारखे नकली चार्जर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. असे बनावट चार्जर वापरल्याने फोनच्या बॅटरीला हानी पोहोचते, ओव्हरहिटिंगची समस्या निर्माण होते आणि काहीवेळा फोन शॉर्टसर्किट होऊन बंद पडू शकतो. अगदी गंभीर प्रकरणांमध्ये आग लागण्याचाही धोका असतो. म्हणूनच चार्जर ओरिजिनल आहे की बनावट, हे ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

25
पॅकेजिंग आणि ब्रँड लोगो तपासा
Image Credit : Getty

पॅकेजिंग आणि ब्रँड लोगो तपासा

ओरिजिनल चार्जर आणि नकली चार्जर यांमधील पहिला फरक त्यांच्या पॅकेजिंगवरूनच ओळखता येतो. कंपनीकडून दिलेल्या चार्जरच्या बॉक्सवर ब्रँडचा लोगो, सीरियल नंबर आणि उत्पादनाची माहिती स्पष्टपणे छापलेली असते. अक्षरांमध्ये चुकाही नसतात. तर नकली चार्जरच्या बॉक्सवर फॉन्ट वेगळा, अस्पष्ट प्रिंटिंग किंवा चुकीचे स्पेलिंग दिसते. तसेच, ब्रँडचे लोगो थोडे फिके किंवा आकाराने वेगळे असू शकतात. त्यामुळे नवीन चार्जर घेताना पॅकेजिंग बारकाईने तपासणे गरजेचे आहे.

Related Articles

Related image1
बयो, आता खरेदी कराया लागतंय... Samsung चे 15000 रुपयांमधील बेस्ट 3 स्मार्टफोन!
Related image2
iPhone ला टक्कर देणारा कॅमेरा, 7000mAh बॅटरी, OnePlus 15 ची किंमत लीक!
35
वजन आणि बनावटपणा ओळखा
Image Credit : Getty

वजन आणि बनावटपणा ओळखा

ओरिजिनल चार्जरचे बांधकाम मजबूत आणि वजन थोडे जड असते. तर नकली चार्जर हलका आणि नाजूक वाटतो. चार्जरचे कनेक्टर पोर्ट, वायरची जाडी, आणि प्लास्टिकचा दर्जा हे देखील ओळखण्यास मदत करतात. बनावट चार्जरमध्ये वायर खूप पातळ असते आणि काही दिवसातच वाकते किंवा सैल होते. ओरिजिनल चार्जरमध्ये वायर लवचिक आणि टिकाऊ असते. याशिवाय, चार्जिंग पिनवर कंपनीचे छोटे लोगो किंवा कोड दिलेले असतात – नकली चार्जरमध्ये ते अनुपस्थित असतात.

45
चार्जिंग स्पीड आणि तापमानावर लक्ष ठेवा
Image Credit : Getty

चार्जिंग स्पीड आणि तापमानावर लक्ष ठेवा

चार्जर खरोखर ओरिजिनल आहे की नाही हे वापरताना देखील लक्षात येऊ शकते. ओरिजिनल चार्जर फोनला समान आणि सुरक्षित वेगाने चार्ज करतो, तर नकली चार्जरमुळे कधी चार्जिंग खूप हळू होते तर कधी अचानक वेग वाढतो. चार्जिंग दरम्यान फोन किंवा चार्जर गरम होऊ लागल्यास तो नकली असण्याची शक्यता असते. शिवाय, चार्जिंग करताना फोनमध्ये आवाज येणे, स्क्रीन फ्लिकर होणे किंवा चार्जिंग केबल वारंवार डिसकनेक्ट होणे हेही संकेत असतात की चार्जर ओरिजिनल नाही.

55
सुरक्षित खरेदीसाठी योग्य स्त्रोत निवडा
Image Credit : our own

सुरक्षित खरेदीसाठी योग्य स्त्रोत निवडा

चार्जर नेहमी अधिकृत सर्व्हिस सेंटर, ब्रँडच्या अधिकृत वेबसाइट किंवा ओळखलेल्या ई-कॉमर्स साइटवरूनच खरेदी करावा. रस्त्यावरच्या दुकानातून किंवा अतिशय कमी किमतीत घेतलेले चार्जर बहुधा नकली असतात. प्रत्येक चार्जरला कंपनीकडून दिलेला सर्टिफिकेशन कोड (IS/CE प्रमाणपत्र) असतो, तो तपासून पाहावा. त्याशिवाय, फोनच्या सेटिंग्जमध्ये “Charging Details” किंवा “Battery Health” विभागात जाऊन चार्जिंग वोल्टेज तपासल्यासही फरक लक्षात येऊ शकतो.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
WOW लूक! अंकिता लोखंडेच्या कलेक्शनमधील 6 आर्टिफिशियल नेकलेस! पार्टीसाठी 'या' ज्वेलरीची लगेच खरेदी करा!
Recommended image2
पायांचे सौंदर्य वाढवा! चांदीच्या जोडव्यांचे 2025 चे सर्वात 'लेटेस्ट आणि हटके' कलेक्शन, सिंगल पीस ते 4 पीस डिझाइन्स!
Recommended image3
शाही लूक हवाय? 'बुगडी इअरिंग्ज'ची ही डिझाईन्स करा ट्राय! शाहीपणात शालीनता, आणि लक्षवेधी सौंदर्य!
Recommended image4
Best Camera Smartphones : 2025 मधील टॉप 5 कॅमेरा स्मार्टफोन, वाचा आकर्षक फिचर्स!
Recommended image5
मृत्यूचा मिसकॉल : सोनाराच्या दुकानात हृदयविकाराचा झटका, दुकानदाराने CPR देऊन वाचला जीव! [Watch]
Related Stories
Recommended image1
बयो, आता खरेदी कराया लागतंय... Samsung चे 15000 रुपयांमधील बेस्ट 3 स्मार्टफोन!
Recommended image2
iPhone ला टक्कर देणारा कॅमेरा, 7000mAh बॅटरी, OnePlus 15 ची किंमत लीक!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved