OnePlus 15 Price in India Leaked : वनप्लस 15 च्या भारतीय व्हेरिएंटचे कॅमेरा, डिस्प्ले, चिपसेट यांसारखे तपशील समोर आले आहेत. ऑक्सिजनओएस 16 प्लॅटफॉर्मवर भारतात येणाऱ्या वनप्लस 15 मध्ये 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल.
OnePlus 15 Price in India Leaked : चायनीज फ्लॅगशिप स्मार्टफोन वनप्लस 15, 13 नोव्हेंबर रोजी भारतात लॉन्च होणार आहे. लॉन्चपूर्वीच वनप्लस 15 फोनची भारतीय किंमत लीक झाली आहे. वनप्लस 15 च्या भारतीय व्हेरिएंटचे कॅमेरा, डिस्प्ले, चिपसेट यांसारखे तपशीलही समोर आले आहेत.
वनप्लस 15 ची भारतात किंमत किती असेल?
वनप्लस 15 हा क्वालकॉमच्या नवीन स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 चिपसेटसह येणारा स्मार्टफोन आहे. हा फोन या चिपसेटसह चीनमध्ये आधीच उपलब्ध झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, भारतात आयफोन 17 च्या स्टँडर्ड मॉडेलला टक्कर देण्याच्या उद्देशाने येणारा वनप्लस 15 पुढच्या पिढीचा अँड्रॉइड अनुभव देईल. फायनान्शियल एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, वनप्लस 13 चा उत्तराधिकारी असलेल्या वनप्लस 15 ची भारतात किंमत 65,000 ते 75,000 रुपयांच्या दरम्यान असेल. चीनमध्ये वनप्लस 15 च्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंटची किंमत 3,999 युआन (सुमारे 50,000 भारतीय रुपये) आहे. भारतात वनप्लस 15 हाय-एंड स्मार्टफोनच्या श्रेणीत असेल हे निश्चित आहे.

वनप्लस 15 स्पेसिफिकेशन्स
अँड्रॉइड 16 वर आधारित ऑक्सिजनओएस 16 प्लॅटफॉर्मवर भारतात येणारा वनप्लस 15 स्मार्टफोन डिटेलमॅक्स इंजिनचे नवीन कॅमेरा तंत्रज्ञान सादर करेल. वनप्लस 15 मध्ये 50-मेगापिक्सलचा ट्रिपल-कॅमेरा सेटअप असेल. हॅसलब्लॅडसोबतची भागीदारी संपवून वनप्लस कॅमेरा विभागात स्वतःचे तंत्रज्ञान सादर करत आहे. वनप्लस 15 स्मार्टफोन भारतीय बाजारात तीन रंगांमध्ये उपलब्ध होईल. 13 नोव्हेंबर रोजी भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजल्यापासून वनप्लस 15 खरेदीसाठी उपलब्ध होईल. ब्रँडच्या ग्लोबल लॉन्च इव्हेंटमध्येच वनप्लसचे अधिकारी वनप्लस 15 फ्लॅगशिप स्मार्टफोनची किंमत आणि संपूर्ण स्पेसिफिकेशन्स अधिकृतपणे जाहीर करतील.

वनप्लस 15 स्मार्टफोनमध्ये 165Hz रिफ्रेश रेटसह 6.78-इंचाचा डिस्प्ले असेल. या हँडसेटमध्ये 7,300mAh बॅटरी, 120W सुपर फ्लॅश वायर्ड चार्जिंग आणि 50W वायरलेस फ्लॅश चार्जिंग सपोर्ट असेल. रिपोर्ट्सनुसार, वनप्लस 15 गेमिंगवर अधिक लक्ष केंद्रित करून तयार करण्यात आला आहे.


