प्रतियुती योग : 2026च्या सुरुवातीला 5 राशींना होणार आर्थिक लाभ
ज्योतिषशास्त्रानुसार, 10 जानेवारी 2026 पासून सूर्य आणि गुरू एकमेकांपासून 180 अंश अंतरावर असतील. अशा स्थितीत सूर्य आणि गुरूच्या स्थितीमुळे 'प्रतियुती दृष्टी योग' तयार होईल. त्याचा काही राशींवर प्रभाव राहील. कोणत्या राशींना हे लाभदायक राहील, ते पाहू.

सिंह रास
सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे. त्यामुळे, जेव्हा सूर्य गुरूशी दृष्टी संबंध ठेवेल, तेव्हा सिंह राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढून गगनाला भिडेल. या काळात मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. शिक्षण क्षेत्रात यश मिळेल. गुंतवणुकीसाठी उत्तम काळ आहे.
तूळ रास
तूळ राशीच्या लोकांसाठी हा योग आर्थिक दृष्ट्याही दिलासा देणारा ठरेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. भागीदारीत केलेला व्यवसाय फायदेशीर ठरेल. नफा मिळू शकतो. व्यक्तिमत्त्वात सुधारणा होईल. लोक तुमच्या बोलण्याने प्रभावित होतील.
धनु रास
धनु राशीचा स्वामी गुरु आहे. सूर्यासोबत गुरूचा संयोग आध्यात्मिक शक्ती आणि बौद्धिक प्रगतीला अनुकूल राहील. लांबच्या प्रवासाला जाऊ शकता, जो फलदायी ठरेल. परदेशी संपर्कांमुळे व्यवसायात फायदा होईल. तुम्हाला वडील आणि शिक्षकांकडून पाठिंबा मिळेल.
कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ करिअरमध्ये मोठे बदल दर्शवतो. हा काळ प्रगतीचे संकेत देतो. नोकरी करणाऱ्यांना बढती मिळू शकते. पगार वाढू शकतो. निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल.

